
सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले विशाल पाटील यांना भाजपकडून पक्षात प्रवेशाची मोठी ऑफर मिळाली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही ऑफर दिली असून सांगलीच्या विकासासाठी विशाल पाटील यांनी भाजपसोबत यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.