रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर शक्तिपीठ द्रुतगती महामार्गाला गती देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या महामार्गाला विरोध असताना तो रेटला जात आहे.
सांगली : कवलापूर विमानतळाची (Kavalapur Airport) १६५ एकर जागा वाचली. तिचा ‘बाजार’ करण्याचा डाव उधळला गेला, मात्र त्यानंतर या जागेवर काही मंडळींनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. ती अतिक्रमणे पाडण्यात आली. आता पुन्हा असा प्रकार होऊ नये आणि जागा सुरक्षित राहावी, यासाठी त्याला कुंपण घालावे, अशी सूचना खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी उद्योग विभागाकडे केली आहे.