
Sangli Politics : ‘मिरज रेल्वे जंक्शन पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे केंद्र आहे, मात्र या ठिकाणी अत्याधुनिक सोयी-सुविधा देण्यात रेल्वेने नेहमी आखडता हात घेतला आहे. त्याचा तातडीने विचार करावा आणि जंक्शन विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा,’ अशी आग्रही मागणी खासदार विशाल पाटील यांनी आज पुण्यात आयोजित पुणे, सोलापूर मंडलमधील खासदारांसमवेत आयोजित रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत केली.