

राज्यात पहिली: खेळाडू (स्पोर्ट्स) कोट्यातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक.
Sakal
सांगली : जिद्द, सातत्य आणि नियोजनबद्ध अभ्यासाच्या बळावर सांगली जिल्ह्यातील इरळी (ता. कवठे महांकाळ) येथील ऐश्वर्या वैशाली तात्यासो खांडेकर हिने अवघ्या २२ व्या वर्षी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात तिने एकाच वर्षात कर सहायक अधिकारी आणि मंत्रालय महसूल सहायक अधिकारी या दोन पदांवर निवड मिळवली असून स्पोर्ट्स कोट्यातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.