मुंबई ते अंकले कोरोना रूग्णाचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मे 2020

जत (सांगली)-  अंकले (ता. जत) येथे मुंबईहून आलेल्या एकाचा "कोरोना' अहवाल "पॉझिटिव्ह' असल्याचे आज पहाटे समजले. त्याच्यासह चौघेजण मुंबईत नोकरीस होते. सर्वजण बुधवारी चेंबूर (मुंबई) हून वाशी येथे टॅक्‍सीने, वाशी ते फलटण आणि तेथून नागजपर्यंत मालट्रकमधून आले होते. नागजहून चौघेजण चालत अंकले येथे आले होते. 

जत (सांगली)-  अंकले (ता. जत) येथे मुंबईहून आलेल्या एकाचा "कोरोना' अहवाल "पॉझिटिव्ह' असल्याचे आज पहाटे समजले. त्याच्यासह चौघेजण मुंबईत नोकरीस होते. सर्वजण बुधवारी चेंबूर (मुंबई) हून वाशी येथे टॅक्‍सीने, वाशी ते फलटण आणि तेथून नागजपर्यंत मालट्रकमधून आले होते. नागजहून चौघेजण चालत अंकले येथे आले होते. 

अंकलेत आलेल्या रूग्णास जिल्हा परिषद शाळेत संस्थात्मक क्वारंटाईन केले होते. त्याला बुधवारी रात्री ताप, मळमळणे, खोकला, आदीसह त्रास होऊ लागला. त्याला कोरोना संशयित म्हणून आरोग्य विभागाने तात्काळ मिरज येथे हलविले होते. आज त्यांचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला आहे. त्यानंतर आज शुक्रवारी त्याच्या संपर्कातील सहा जणांचे "स्वॅब' घेण्यात आले आहेत. त्यांना ही जतमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. या अहवालानंतर अंकले गाव "सील' करण्यात आले आहे. तसेच सावधगिरी म्हणून तालुक्‍यातील प्रमुख सीमा पूर्णपणे "सील' करण्याच्या दृष्टीने तालुका प्रशासनाने पवित्रा घेतला आहे. 

अंकलेतील कोरोना बाधित रूग्ण मुंबईत कत्तलखान्यात कामाला होता. "लॉकडाउन' नंतर जेवणाची अडचण निर्माण झाल्याने तो मालकाच्या घरी जेवायला होता. त्यानंतर 4 मे रोजी तो आणि गावातील तिघेजण चेंबूरहून टॅक्‍सीने वाशी, तेथून ट्रकने फलटण व फलटणहून पुन्हा ट्रकमधून नागजपर्यंत आले. तेथून पायी चालत बुधवारी मध्यरात्रीनंतर अंकले येथे आले. तो घरी न जाता सरळ जिल्हा परिषद शाळेत राहायला गेला. आरोग्य विभागाने त्याला संस्थात्मक "क्वारंटाईन' केले. बुधवारी दुपारी दोन वाजता त्याला ताप येणे, मळमळणे व खोकला सुरू झाला. त्यानेच स्वतः फोनवरून डफळापूर आरोग्य केंद्रात डॉक्‍टरांना सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा नऊ वाजता सांगलीच्या टीमने कोरोना संशयित रूग्ण म्हणून मिरजेत हलविले. त्यानंतर आज त्याचा अहवाल "पॉझिटिव्ह' आला. त्याच्यासह आलेले तिघे अन्य संपर्कातील तिघे अशा सहाजणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यांना जत शहरात संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. 
 

अंकले गाव "कंटेनमेंट झोन'- 
अंकले गाव सुरक्षेच्या दृष्टीने कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे. इतर संपर्कातील सहा जणांना संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, आरोग्याची काळजी घ्यावी. अनावश्‍यक संपर्क टाळा, असे आवाहन जतचे तहसिलदार सचिन पाटील यांनी केले. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From Mumbai to Ankle Corona patient journey