Mumbai Bengaluru Special Train
esakal
मिरज : आगामी दसरा, दीपावली आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई-बंगळूर दरम्यान मिरजमार्गे साप्ताहिक वातानुकूलित विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते एसएमव्ही बंगळूर आणि परतीच्या मार्गावर या विशेष गाडीच्या एकूण १४ फेऱ्या होणार (Mumbai Bengaluru AC special train Dussehra Diwali 2026) आहेत. त्यामुळे मुंबई, पुणे, सातारा, कऱ्हाड, सांगली, मिरजेसह पश्चिम महाराष्ट्रातील, तसेच कर्नाटकातील प्रवाशांना सणासुदीच्या काळात अतिरिक्त रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे.