Tasgaon Grapes : तासगावच्या द्राक्षांनी मुंबई मार्केटमध्ये केली हवा; कुमठे गावच्या माळी कुटुंबाच्या कष्टाचे झाले चीज
Sangli News : द्राक्ष पीक नाशवंत, पण शाश्वत दर देणारे नसले तरीही द्राक्ष पिकातून चांगले उत्पन्न घेता येते. योग्य व्यवस्थापन, बाजारपेठेचा कौल, हवामानाचा अभ्यास अशा गोष्टींना महत्त्व देत कुटुंबाला उभारी मिळाली आहे.
कवठे एकंद : कुमठे (ता. तासगाव) येथील पोलिस पाटील, प्रगतिशील बागायतदार प्रकाश सावंता माळी यांच्या ‘अनुष्का’ जातीच्या द्राक्षांना मुंबई मार्केटमध्ये चांगली पसंती आहे. प्रति चार किलो द्राक्षाला ३०१ रुपये असा उच्चांकी दर मिळत आहे.