लक्‍झरीतून मुबंईच्या महिलेची लाखाची चोरी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 January 2020

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी वेंकटेश्‍वर स्वामी (वय 27, रा. डोंबिवली, मुंबई) या मणक्‍याच्या उपचारासाठी हैदराबादला गेल्या होत्या. उपचार करून लक्‍झरीतून पुन्हा त्या मुंबकडे निघाल्या होत्या. जवळ असलेले साहित्य लक्‍झरीच्या क्‍लिनरने मागील डिकीत ठेवण्याची सूचना केली.

मोहोळ (सोलापूर) : चालत्या लक्‍झरीमधून सोने व रोख रक्कम असा 95 हजारांचा ऐवज चोरीस गेल्याची घटना रविवारी (ता. 5) पहाटे पावणेतीन वाजता सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्‍वर शिवारात घडली. या संदर्भात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संशयावरून पोलिसांनी अब्दुल बारी, मोहम्मद उस्मान भोले (रा. बसवकल्याण), नूरखान हसनखान खान (रा. राजेश्‍वर), यल्लालिंग यल्लप्पा बेमळगी (रा. हसनगुंडगी, ता. कलबुर्गी) या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी वेंकटेश्‍वर स्वामी (वय 27, रा. डोंबिवली, मुंबई) या मणक्‍याच्या उपचारासाठी हैदराबादला गेल्या होत्या. उपचार करून लक्‍झरीतून पुन्हा त्या मुंबकडे निघाल्या होत्या. जवळ असलेले साहित्य लक्‍झरीच्या क्‍लिनरने मागील डिकीत ठेवण्याची सूचना केली. त्याप्रमाणे लक्‍झरीच्या मागील डिकीत साहित्य ठेवले. दरम्यान, लक्‍झरी जेवणासाठी जहिराबाद येथे थांबली. तेथे प्रवाशांनी जेवण घेतले. त्यानंतर हुमनाबाद येथे पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी थांबली. डिझेल भरून गाडी सुरू झाल्याने सर्व प्रवासी झोपी गेले. 

हेही वाचा : हा "सात रस्ता' अनियंत्रित वाहतुकिचा नमुना (व्हिडिओ) 
त्यांनी साहित्याची तपासणी

लक्‍झरी सावळेश्‍वर टोल नाक्‍याच्या पुढच्या बाजूला आल्यानंतर लक्ष्मी यांनी शौचविधीसाठी गाडी थांबवण्याची सूचना केली. गाडी थांबली असता गाडीच्या मागे दोन चालक व एक क्‍लिनर व एक पुरुष असे बोलताना दिसले. शंका आल्याने लक्ष्मी यांनी त्यांना गाडीमागे का थांबला असे विचारले असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. संशय जास्तच बळावल्याने मागे जाऊन त्यांनी साहित्याची तपासणी केली. तेव्हा सोन्याचे दागिने व रोख 15 हजार असा ऐवज चोरीस गेल्याचे लक्षात आले. आमच्या बरोबरच प्रमिला स्वामी (वय 55), इलमान आजेखान खान (वय 32), हर्ष मेहता (वय 21), विनुप दासरी (वय 28), नीरज सोनी (वय 45) यांचेही लक्‍झरीच्या मागे ठेवलेले साहित्य चोरीस गेल्याचे आढळले. या घटनेची फिर्याद महालक्ष्मी स्वामी यांनी मोहोळ पोलिसांत दिली असून हवालदार चवरे तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai woman stolen from luxury