esakal | महापालिकेच्या समिती निवडणुकीत NCP ची माघार; 'भाजप'चा विजयी झेंडा
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेच्या समिती निवडणुकीत NCP ची माघार; 'भाजप'चा विजयी झेंडा

भाजपने सावध पवित्रा घेत गेल्या महिन्यात महापालिकेची स्थायी समिती राखण्यात यश मिळवले.

महापालिकेच्या समिती निवडणुकीत NCP ची माघार; 'भाजप'चा विजयी झेंडा

sakal_logo
By
बलराज पवार

सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची महिला बालकल्याण समिती चिठ्ठीने भाजपकडेच राहिली. त्यामुळे गीतांजली ढोपे पाटील यांना सलग दुसऱ्यांदा सभापती पदाची संधी मिळाली. तर समाज कल्याण समिती निवडणुकीत राष्ट्रवादीने माघार घेतल्याने भाजपचे सुब्राव मद्रासी बिनविरोध विजयी झाले.

सांगली, मिरज कुपवाड शहर महापालिकेच्या महिला बालकल्याण आणि समाज कल्याण समितीच्या सभापती निवडी आज झाल्या. सात महिन्यांपूर्वी झालेल्या महापौर-उपमहापौर निवडीवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने भाजपला धक्का देत त्यांचे सात नगरसेवक फोडून सत्ता हस्तगत केली होती. मात्र त्यानंतर भाजपने सावध पवित्रा घेत गेल्या महिन्यात महापालिकेची स्थायी समिती राखण्यात यश मिळवले. त्यानंतर आता महिला बालकल्याण आणि समाज कल्याण या समित्याही आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले आहे.

हेही वाचा: लहान मुलांसाठी आपत्कालीन वापराला 'कोव्हॅक्सिन'ला मंजुरी

महिला बालकल्याण समितीमध्ये भाजपचे नऊ तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे सात सदस्य आहेत. भाजपकडून गीतांजली ढोपे पाटील यांना सलग दुसऱ्यांदा सभापतीपदासाठी संधी दिली. तर काँग्रेस आघाडीकडून काँग्रेसच्या शुभांगी साळुंखे यांची उमेदवारी होती. महापौर निवडीवेळी काँग्रेस आघाडीला सहकार्य करणाऱ्या भाजपच्या नसीमा नाईक यांनी यावेळीही आघाडीलाच साथ दिली. त्यामुळे ढोपे पाटील आणि साळुंखे या दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी आठ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी चिठ्ठी टाकून सभापती निवडण्याचा निर्णय घेतला. यात गीतांजली ढोपे पाटील यांचे नाव निघाल्याने त्यांना दुसऱ्यांदा सभापती होण्याची संधी मिळाली.

समाज कल्याण सभापती निवडीत भाजपचे उमेदवार सुबराव मद्रासी यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात होते. या समितीमध्ये भाजपचे सात, राष्ट्रवादीचे तीन तर काँग्रेसचे एक असे अकरा सदस्य आहेत त्यामुळे भाजपचा विजय जवळपास निश्चित होता. भाजपच्या सदस्यांमध्ये महापौर निवडीवेळी फुटलेले आनंदा देव माने आणि स्नेहल सावंत यांचा समावेश होता. मात्र या सदस्यांना भाजपने आपल्याकडे वळवल्याने सुब्राव मद्रासी यांचे पारडे जड झाले होते. राष्ट्रवादीचे उमेदवार योगेंद्र थोरात यांनी आपली उमेदवारी माघार घेतली. त्यामुळे सुबराव मद्रास यांची समाज कल्याण सभापतीपदी बिनविरोध निवड झाली.

हेही वाचा: निवडणूक शपथपत्र : फडणवीसांविरोधात तक्रार, साक्ष नोंदणी प्रक्रिया सुरू

loading image
go to top