महापुराबाबत माहितीसाठी महापालिकेचे आपत्ती मित्र ऍप 

बलराज पवार
Monday, 13 July 2020

सांगली-  महापालिकेने महापूर तसेच अन्य आपत्ती काळात उपयोगी पडणारे मोबाईल ऍप तयार केले आहे. प्रत्येकाला घरबसल्या महापुरासंबंधी अपडेट मिळत जातील. नागरिकांनी भिती बाळगू नये, असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले. 

सांगली-  महापालिकेने महापूर तसेच अन्य आपत्ती काळात उपयोगी पडणारे मोबाईल ऍप तयार केले आहे. प्रत्येकाला घरबसल्या महापुरासंबंधी अपडेट मिळत जातील. नागरिकांनी भिती बाळगू नये, असे आवाहन आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले. 

महापालिकेने तयार केलेल्या "आपत्ती मित्र' ऍपचे लोकार्पण आमदार सुधीर गाडगीळ, महापौर गीता सुतार यांच्या हस्ते झाले. आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर आनंदा देवमाने, स्थायी सभापती संदीप आवटी, गटनेते युवराज बावडेकर उपस्थित होते. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून हे ऍप तयार करण्यात आलेय. महापुराची अपडेट माहिती ऍपद्वारे उपलब्ध करुन देणारी सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका राज्यातील पहिली ठरली आहे. मुख्यालयातील वसंतदादा पाटील सभागृहात कार्यक्रम झाला. 

महापौर गीता सुतार म्हणाल्या,""पाणी पातळीबाबत व धोक्‍याबद्दल ऍपमुळे वेळेत वसतुस्थितीजन्य माहिती मिळू शकेल.'' 
आयुक्त कापडणीस म्हणाले,""अडचणी व त्रुटी लक्षात घेऊन ऍप तयार केलेय. पूरपट्ट्यात महापुराबाबत दक्षता घेण्यास आणि संभाव्य धोक्‍याची माहिती मिळू शकेल. जीवित हानी टाळता येईल. नुकसान वाचवता येईल.'' 
सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते व टीमकडून ऍपसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. नगरसेविका उर्मिला बेलवलकर, नसीमा नाईक, गीतांजली धोपे-पाटील, प्रभाग दोनचे सभापती विनायक सिंहासने, नगरसेवक गजानन मगदूम, सहायक आयुक्त सहदेव कावडे, जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद उपस्थित होते. 

हे आहे ऍपमध्ये 

  • आपत्कालीन सेवा, महापुराबाबत माहिती मिळणार 
  • कोयना, अलमट्टीची पातळी, विसर्ग कळणार 
  • पाणी कुठल्या भागात वाढणार हे समजणार. नकाशासहित माहिती 
  • निवारा केंद्रे, मदत केंद्रांची माहिती मिळेल 
  • आपत्ती व्यवस्थापनाची माहिती, संपर्क क्रमांक कळतील 

आयुक्त, प्रशासनाचे काम चांगले 

कोरोना साथीच्या संकटात आयुक्त आणि प्रशासन चांगले काम करीत आहेत. नागरिकांनीही स्वत:ची काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, अशा शब्दात आमदार गाडगीळ आणि महापौर सौ. सुतार यांनी कौतुक केले. 

 

संपादन : घनशाम नवाथे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation's Disaster Mitra app for information about floods