आटपाडी: नगराध्यक्ष-नगरसेवकपदाची उमेदवारी डावलल्याने सर्वच पक्षांतील अनेक उमेदवार नाराज आहेत. एबी फॉर्म नसल्याने त्यांचे अर्ज बाद झाले, तर काहींनी पक्षासह अपक्ष उमेदवारी अर्ज भरले. त्यांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे. .भाजप, शिवसेना, स्वाभिमानी आणि राष्ट्रवादीने उमेदवारी डावलल्याने नाराजांसह आणि बंडखोरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांची मनधरणी सुरू झाली आहे. त्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे..Sangli News: ‘तुतारी’ गायब! पडळकरांचा जोरदार हल्लाबोल; भाजपची रॅली ठरली शक्तीप्रदर्शनाचा मोठा महोत्सव.नगरपंचायतीच्या निवडणुकीची अर्ज छाननीची प्रक्रिया झाल्यानंतर पक्षाने कोणाला उमेदवारी दिली, डावलले, याचे चित्र स्पष्ट झाले. सर्वच पक्षांतून नगराध्यक्ष, नगरसेवकपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक होती. .त्यामुळेच नगराध्यक्षासाठी २२, तर नगरसेवकसाठी १९७ अर्ज दाखल झाले. पक्षाच्या नावाने अर्ज भरलेल्याचे नगराध्यक्षाचे दहा, तर नगरसेवकाचे ७५ अर्ज एबी फॉर्म नसल्याने अवैध ठरले. छाननीनंतर नगराध्यक्षपदासाठी १२ आणि नगरसेवकसाठी १२२ अर्ज शिल्लक राहिलेत..Sangli News: आष्टा निवडणुकीत अर्जांचा विक्रमी पाऊस! नगराध्यक्षपदासाठी ११ तर नगरसेवकपदासाठी तब्बल २०६ अर्ज दाखल.काहींनी भाजप, राष्ट्रवादी आणि अपक्ष असे तीन-तीन अर्ज दाखल केले होते. त्यांचे पक्षाच्या नावाचे अर्ज बाद झाले, तर अपक्ष अर्ज राहिला आहे. सर्वच पक्षांतून इच्छुकाची संख्या अधिक होती. उमेदवारी देताना नेत्यांना शेवटच्या क्षणापर्यंत कसरत करावी लागली. .उमेदवारी एकालाच मिळणार, त्यामुळे इतर नाराज होणार गृहीत होते. कमीत कमी नाराजी व्हावी, यासाठी उमेदवारी देतानाच काळजी घेतली, तरीही नाराजांची संख्या अधिक आहे. ती शिवसेना आणि भाजपमध्ये लक्षणीय आहे..छाननीनंतर एबी फॉर्म नसल्याने अर्ज बाद झालेल्यांनी विरोधकांशी हातमिळवणी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अपक्षांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे. नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी काल रात्रीपासूनच बैठकांचे सत्र सुरू आहे. सुरुवातीला नेते, कार्यकर्त्यांनी नाराजांसोबत बैठका घेतल्या. .विरोधी गटात जाऊ नये आणि बंडखोरी टाळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले. काही नाराजांची कार्यकर्त्यांकडून नाराजी दूर झाली नाही. तिथे नेतेमंडळींनी लक्ष घातले आहे. नाराजांची नाराजी घालवण्यासाठी शब्द दिला आहे, तरीही काहींची नाराजी दूर न झाल्याने नाराजांनी पक्षांतराची घोषणा केली आहे..दोन दिवस पक्षांतर रंगणार उमेदवारी डावल्याने नाराज झालेल्या काहींनी पक्षांतराची घोषणा केली. काहींच्या विरोधकांसोबत बैठका सुरू आहेत. काही नाराज द्विधा मनःस्थितीत आहेत. येणाऱ्या दोन दिवसांत नाराजांची भूमिका स्पष्ट होऊन पक्षांतरांच्या घडामोडींची शक्यता आहे. पक्षांतराचे नाट्य दोन ते चार दिवस रंगलेले दिसेल. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.