सलगरेत प्रेमसंबंधातून तरुणाच्या डोक्यात वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

सलगरेत प्रेमसंबंधातून तरुणाच्या डोक्यात वार

कवठेमहांकाळ : सलगरे (ता. मिरज) येथे कर्नाटकातील युवकाचा प्रेमसंबंधातून डोक्यात कोयत्यासारख्या हत्याराने वार करून खून करण्यात आला. संदीप रामराव आवळेकर (वय ३३, रा. अरळीहट्टी, ता. अथणी, जि. बेळगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. काल (ता. ३) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी संशयित आकाश ऊर्फ भय्या माणिक जाधव (वय २३, रा. अरळीहट्टी), राम नायकू इंगळे (१९, रा. मुकुंदनगर, तारदाळ, ता. हातकणंगले), अनिल बापू जाधव (२८, रा. अरळीहट्टी), सागर सहदेव जाधव (२३, रा. हनुमाननगर, सांगली, मूळ रा. अरळीहट्टी) या चौघांना कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी मृत संदीप आवळेकर याचे अरळीहट्टी येथील एका महिलेशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे संशयितांना त्याचा राग होता. याच रागातून त्यांनी संदीपचा काटा काढण्याचे ठरविले. संदीप हा काल (ता. ३) सलगरे येथील दवाखान्यात मित्रासोबत आला होता. दवाखान्यातून परत सलगरे गावातून रात्री दहाच्या सुमारास अरळीहट्टी येथे गावाकडे दुचाकीवरून जाण्यासाठी निघाला होता. सलगरे येथील पेट्रोलपंपाजवळ काही अंतरावर भावकर लवाण येथे