जत तालुक्‍यात  गुंडाचा गोळ्या झाडून खून 

बादल सर्जे 
Friday, 9 October 2020

जत (सांगली) : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार व गुंड धनाजी नामदेव मोटे (वय , रा. कंठी, ता. जत) याचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून व डोके दगडाने ठेचून निघृनपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. गुरूवारी मध्यरात्री कंठी (ता. जत) येथील मरगुबाई देवीच्या मंदिराजवळ ही घटना घडली.

खूनाचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेनंतर मारेकरी फरार झाले असून त्याचा शोध जत पोलिस करत आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धनाजी मोटे हा हत्यारांची तस्करी, यासह अनेक गुन्हे जत पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

सांगली शहर पोलिसात ही त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. गुरूवारी मध्यरात्री ते वाजण्याच्या सुमारास धनाजी मोटे यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून व डोक्‍यात दगड घालून निघृनपणे खून केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली होती. 

दरम्यान, शुक्रवारी पहाटे घटनास्थळी मृतदेहाजवळ दुचाकी व बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. अद्याप खूनाचे कारण व मारेकऱ्यांना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नव्हते.

तर जत उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक उत्तम जाधव व सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांकडून तपासाच्या अनुषंगाने शोघ घेत आहेत. 

संपादन ः अमोल गुरव 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder in Jat taluka