esakal | कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा गडमुडशिंगीत खून 
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा गडमुडशिंगीत खून 
  • गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील मध्यवर्ती हुडा परिसरात धारदार शस्त्राने आणि दगडाने हल्ला चढवून तरुणाचा निर्घृण खून. 
  • ऋषिकेश उर्फ चेअरमन अशोक कांबळे (वय 22, रा. गडमुडशिंगी) असे मृत तरुणाचे नाव
  • पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे गांधीनगर पोलीसांची माहिती 

कोल्हापूर : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा गडमुडशिंगीत खून 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर - गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील मध्यवर्ती हुडा परिसरात धारदार शस्त्राने आणि दगडाने हल्ला चढवून तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. ऋषिकेश उर्फ चेअरमन अशोक कांबळे (वय 22, रा. गडमुडशिंगी) असे मृत तरुणाचे नाव आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशीच ही घटना घडल्याने गडमुडशिंगी परिसरात रात्री उशिरापर्यंत आणि आज सकाळी तणाव होता.

पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचे गांधीनगर पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. याप्रकरणी पंकज दिलीप कांबळे (21) , पद्मजीत दिलीप कांबळे (24), रोहित मोहन कांबळे (42, तिघेही रा. गडमुडशिंगी ) याना अटक केली असून, चौथा संशयित दिलीप यल्लपा कांबळे (55, रा.गडमुडशिंगी) यास कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल केले आहे. 

वडील, दोघे भाऊ व एक नातेवाईक यांनी संगनमताने ऋषिकेशचा खून केला. सोमवारी रात्री उशिरा पंकज कांबळे याने धारदार शस्त्राने ऋषिकेशच्या छाती व पोटावर गंभीर वार केले. त्याच वेळी पद्मजीत कांबळे याने ऋषिकेशच्या डोक्‍यावर दगडाने मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना काहीजण भांडण सोडविण्यासाठी जात होते, त्यांना दिलीप कांबळे व रोहित कांबळे यांनी रोखले.

"तुम्ही मध्ये पडू नका' असे धमकावले. त्यानंतर या दोघांनीही दगड-विटांनी ऋषिकेशला मारहाण करून गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ऋषीकेशला सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत अमृतकर व गांधीनगर पोलिस ठाणेचे सहायक पोलिस निरिक्षक दीपक भांडवलकर यांनी भेट देऊन पाहणी केली. 

याबाबत ऋषीकेशचा भाऊ विनायक अशोक कांबळे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर करत आहेत. 

चोरीच्या संशयाने कृत्य 
पद्मजित कांबळे याचे मे महिन्यात लग्न झाले.लग्नाच्या वेळी घरातून काही रोकड रक्कम चोरीला गेली होती. ही चोरी ऋषीकेशने केल्याचा संशय या चौघा संशयितांना होता. तेंव्हांपासून ऋषीकेशवर हे चौघेही चिडून होते. 

loading image
go to top