बहिणीच्या दिरावर बियरच्या बाटलीने हल्ला; दोघांविरोधात गुन्हा दाखल

बहिणीच्या अपघातानंतर वैद्यकीय खर्च देण्यास नकार दिल्याने बहिणीच्या दिराच्या डोकीत बियरच्या बाटलीने हल्ला करुन खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
crime
crimesakal
Summary

बहिणीच्या अपघातानंतर वैद्यकीय खर्च देण्यास नकार दिल्याने बहिणीच्या दिराच्या डोकीत बियरच्या बाटलीने हल्ला करुन खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

बेळगाव - बहिणीच्या अपघातानंतर वैद्यकीय खर्च देण्यास नकार दिल्याने बहिणीच्या दिराच्या डोकीत बियरच्या बाटलीने हल्ला करुन खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. राजू गौडाप्पा बगमट्टी (वय २८, रा. पेठ गल्ली, बडाल अंकलगी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी सोमवारी (ता. २३) शहापूर पोलीस ठाण्यात दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

विनायक मल्लाप्पा कोलारकोप्प (वय ३५, रा. बडाल अंकलगी) व के. के. कोप्प येथील आणखी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शहापूर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, फिर्यादी राजूचा भाऊ रमेश हा आपल्या पत्नीसमवेत अनगोळ येथे राहत होता. एक वर्षापूर्वी रमेशची पत्नी नंदा माहेरी गेली होती. त्यावेळी फिर्यादी राजूच्या आजीचे निधन झाल्याने दिवस कार्यासाठी नंदा ही आपला भाऊ विनायकच्या मोटार सायकलवरुन येत होती. त्यावेळी मोटार सायकलवरुन पडल्याने ती जखमी झाली होती. त्यामुळे वैद्यकीय खर्च विनायकला करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, त्याने भावोजीकडे रुग्णालयाचा खर्च देण्याची मागणी केली. त्यावेळी फिर्यादी राजूने पैसे देत नाही, असे म्हटल्याने विनायकने त्याच्यावर राग धरला होता.

गुरुवारी (ता. २०) फिर्यादी गवंडी काम संपवून सायंकाळी सहाच्या सुमारास धारवाड रोड नाका येथील महाराजा वाईन शॉपमध्ये मद्यप्राशन करत बसला होता. त्यानंतर महाराजा वाईन शॉपसमोर येडियुराप्पा मार्गावरील सार्वजनिक रस्त्यावर थांबला असताना वरील दोघा संशयितांनी त्याच्यासोबत ६.४५ च्या सुमारास विनाकारण भांडण काढत राजूच्या डोक्यात बिअरच्या बाटलीने वार केला. तसेच त्याच्या शरीरावरही बाटलीने वार करण्यात आले. त्यामुळे तो जखमी झाला. यावेळी त्याला जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. त्यामुळे राजूने याप्रकरणी सोमवारी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर पुढील तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com