

Legal Trouble: Music Composer Palash Muchhal Booked Under Atrocities Act in Sangli
Sangli
सांगली : भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिच्याशी विवाह मोडल्यानंतर चर्चेत आलेला संगीतकार, गीतकार पलाश मुच्छल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आज त्याच्याविरोधात विज्ञान प्रकाश माने (वय ३४, शास्त्रीनगर, सांगली) यांनी जातिवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी मुच्छल विरोधात ‘ॲट्रॉसिटी’च्या कलमाखाली गुन्हा दाखल केला. हा प्रकार २२ नोव्हेंबर २०२५ रोजी घडला होता.