म्युझिकल हीलिंगने जागवले सोलापूरकरांत चैतन्य 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मार्च 2019

सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून स्त्रीशक्तीचा जागर केला. 

सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून स्त्रीशक्तीचा जागर केला. 

मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या मातोश्री मंगलाताई परदेशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस, "सकाळ'चे संपादक संचालक श्रीराम पवार, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या पत्नी दीपाली भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या पत्नी अश्‍विनी भारुड, आई कमलाबाई भारुड, पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या पत्नी मीनल पाटील, मीनल पाटील यांच्या आई सविता कोसंदल, पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या कविता नेरकर, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले, कार्यक्रमाच्या समन्वयक तथा दयानंद वाणिज्य महाविद्यायाच्या प्राचार्या डॉ. कीर्ती पांडे, "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांच्या पत्नी विशाला दिवाणजी आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सर्वांना मतदान जनजागृतीची शपथ दिली. यावेळी सकाळ तनिष्का सदस्या शैला गोडसे, शीतल करे-पाटील, कुमुदिनी पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी प्रास्ताविक केले. मुख्य उपसंपादक रजनीश जोशी यांनी सूत्रसंचालन केले. जाहिरात विभागाचे व्यवस्थापक अभय सुपाते यांनी आभार मानले. 

गायिका साधना गांगण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थितांनी नामस्मरण केले. आय लव माय सेल्फ म्हणताना साऱ्यांचे चेहरे आनंदाने खुलून गेले होते. जलतत्व, अग्नीतत्वाची तसेच सप्तचक्रांची माहिती त्यांनी दिली. ॐ नम शिवाय..च्या जपामुळे वातावरणात सकारात्मकता निर्माण झाली. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली.., ऐरणीच्या देवा तूला ठिणगी ठिणगी वाहू दे.., वारा गाई गाणी.. यासह इतरही मराठी गाणी त्यांनी सादर केली. तू कितनी अछ है.. ओ मा.. या गाण्यातून साऱ्यांनीच आईला नमन केले. देवी नर्मदेऽऽ या गाण्याला सारेच तल्लीन झाले होते. इतरांना माफ करायला शिका, आनंदी रहाल. सर्वकाही स्त्रीशक्तीच्या हातात आहे, असे सांगताना गांगण यांनी स्वतःवर प्रेम करण्याचा संदेश दिला. सोलापूरला स्मार्ट करण्यासाठी सर्वांनी स्मार्ट होण्याचे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमात विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आपल्या आईसह उत्साहाने सहभाग नोंदविला. 

तबल्यावर सुधीर शिंगाडे, बासरीची साथ विजू तांबे, सुर्यकांत सुर्वे, सिंथेसायझरवर ललीत प्रशांत यांनी साथ दिली. साउंड इंजिनिअर बादल शेटे, शैलेश पुराणिक यांनीही आपली जबाबदारी पार पाडली. यावेळी या कार्यक्रमास अश्‍विनी ग्रामीण रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. माधवी रायते, डॉ. रोहिणी देशपांडे, न्यासा टीमचे मॅनेजिंग डायरेक्‍ट रविकुमार सोलापूरे, प्रा. अरुणा देशपांडे, सतीश शेंडे, बसवराज बिराजदार, प्रा. श्रीनिवास भंडारी, विनोद दुधनी, गुरुराज सोलापूरे आदी उपस्थित होते. 

यांचे मिळाले सहकार्य.. 
स्त्रीशक्तीचा जागर या कार्यक्रमासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळासोबतच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, सोलापूर महापालिका, कृषी विभाग व आत्मा, नरेंद्र पासलकर, पुणे, अन्न व औषध प्रशासन, अमर जलचे पदम राका, स्पेनका वॉटरचे सुहास आदमाने, इस्कॉन, श्रीशैल बनशेट्टी, विष्णू निकंबे, प्रशांत बाबर, कल्पेश मालू, ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, धनश्री महिला गृहउद्योगचे सिद्धार्थ रेळेकर, जटावू अक्षरसेवाचे सुनील कुलकर्णी, ट्‌विंकल इंग्लिश मिडीअम स्कूल, चंद्रशेखर रेड्डी, कल्लप्पा होसूरे, डॉ. बी. बी. पुजारी, उद्योगपती बिपीन पटेल यांचे सहकार्य लाभले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: musical healing program at solapur