esakal | अन् 14 दिवसात तिच्या चेहऱ्यावर आली ‘मुस्कान’
sakal

बोलून बातमी शोधा

अन् 14 दिवसात तिच्या चेहऱ्यावर आली ‘मुस्कान’

अन् 14 दिवसात तिच्या चेहऱ्यावर आली ‘मुस्कान’

sakal_logo
By
अजित कुलकर्णी

सांगली : दुभंगलेल्या ओठांचा शाप घेऊनच मुस्कान जन्माला आली. या विद्रुपतेमुळे बालपणापासून उपेक्षाच वाट्याला आली. सोबतीला घरचे दारिद्र्य. ना बालसवंगडी ना...ना शाळा-शिक्षण या कोमजलेल्या बालपणाला आशेचे किरण दाखवण्याचे काम येथील डॉ. नितीन नायक आणि प्लास्‍टिक सर्जन डॉ. अविनाश पाटील यांनी केले आहे.

मुस्कान मुल्ला ही कुपवाडजवळच्या बाळकृष्णनगरात झोपडीवजा पत्र्याच्या घरात जन्मली. जन्मतःच दुभंगलेला ओठ. हिरडीवर आलेल्या दातामुळे चेहऱ्यावर विद्रुपता. सतत तोंड लपवत तिचे बालपण गेले. पोटाची खळगी भरण्यासाठी आई मशिदमा मजुरीला जायची. छोट्या मुस्कानकडे पहायला कोणाला सवड? घरात छोटी बहीण हीच तिची मैत्रीण. शाळा दुरावली. मात्र या दुरावलेल्या शाळेमुळेच तिच्या आयुष्यात आशेचे क्षण आले आहेत.

हेही वाचा: सांगलीत घंटा वाजणार, शाळा भरणार! शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

भारती विद्यापीठातून निवृत्त झालेल्या डॉ. नितीन नायक यांनी अशा उपेक्षित शाळाबाह्य मुलांसाठी ‘राधानगरी’ फार्महाऊसवर शाळा सुरू केली. या शाळेत मुस्कान दाखल झाली. डॉ. नायक यांनी तिला पाहिले आणि तिच्यावर उपचाराचा निर्णय घेतला. घरी आई मशिदमा याच कुटुंबप्रमुख. त्यांच्या संमतीने डॉ. नायक यांनी तिला सुश्रूत हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. अविनाश पाटील भूलतज्‍ज्ञ डॉ. सुरेश पाटील यांच्या टीमने नुकतीच तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. गेली ९ वर्षे व्यंग घेऊन जगणाऱ्या मुस्कानचा चेहऱ्यावर १४ दिवसांत नवे हास्य फुलले. आता मुस्कानपुढे नवे जग खुले झाले आहे. त्यासाठी समाजानेच तिला तो आत्मविश्‍वास दिला आहे.

मुस्कानच्या चेहऱ्यावर नवे हास्य यावे, यासाठी समाजमाध्यमावर केलेल्या आवाहनाला देश-परदेशातून मदतीचा हात दिला. मुस्कानच्या चेहऱ्यावरचे हास्य मोठे समाधान देणारे आहे. आता तिच्या शिक्षणासाठी आमचे प्रयत्न असतील.

- डॉ. नितीन नायक

loading image
go to top