esakal | माझा बाप आभाळाएवढा!; हौसाक्कांनी दिला क्रांतीसिंहाच्या स्मृतींना उजाळा
sakal

बोलून बातमी शोधा

My father is as big as the sky !; Hausakka gave the memory of Krantisinha Nana Patil

95 वर्षे वयाच्या हौसाक्कांनी "सकाळ' शी क्रांतीसिंहच उभे केले. उद्या (ता. 6) क्रांतीसिंहाचा 44 वा स्मृतीदिन. त्यानिमित्त क्रांतीसिंहाचे पहिले व अखेरचे दर्शन सांगताना त्या भावूक झाल्या. 

माझा बाप आभाळाएवढा!; हौसाक्कांनी दिला क्रांतीसिंहाच्या स्मृतींना उजाळा

sakal_logo
By
दीपक पवार

आळसंद (जि. सांगली) : आभाळाएवढ्या उंचीच्या बापाची मी लेक याचा मला अभिमान आहे. त्यांच्या क्रांतीमय आयुष्यातील अनेक प्रसंगाबरोबरच 44 वर्षापुर्वी मधुमेहाच्या त्रासाने अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेतील त्यांचे अखेरचे दर्शन आजही माझ्या डोळ्यासमोर तरळते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सुवर्णपान ठरावे, अशा प्रतिसरकार चळवळीचे नेते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या हौसाक्का पाटील वडिलांच्या, दादांच्या आठवणींना उजाळा देत होत्या. 95 वर्षे वयाच्या हौसाक्कांनी "सकाळ' शी क्रांतीसिंहच उभे केले. उद्या (ता. 6) क्रांतीसिंहाचा 44 वा स्मृतीदिन. त्यानिमित्त क्रांतीसिंहाचे पहिले व अखेरचे दर्शन सांगताना त्या भावूक झाल्या. 

त्या म्हणाल्या,"" तीन वर्षांची आई गेली तर दादा भूमिगत होते. त्यांची पहिली भेट झाली तीच मुळी पाचव्या-सहाव्या वर्षी. दादा तुरूंगातून येणार म्हणून सारी मंडळी वाट पाहत होते. दादा आले. आजीच्या पाया पडले. कुतुहलाने मी तिच्या पदराआडून पाहत होते. आजीला विचारलं हे कोण? माझ्या प्रश्‍नानं साऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते कुठं होते या माझ्या प्रश्‍नावर आजीने ते तुरुंगात असल्याचे सांगितले. मग दादांनीच मला जवळ ओढलं. 

त्या म्हणाल्या,""तुझ्या मैत्रिणी तुला खेळत घेत नसतील, तर तू काय करशील? मी म्हणाले,"मी भांडण काढेन.'' दादा म्हणाले,""परक्‍या देशातील लोक आपल्याला गुलाम करू लागले म्हणून त्यांच्याशी भांडण करायला गेलो होतो.'' मीही म्हणाले,"" मीही येईन सरकारशी भांडायला.'' 
माझ्या बोलण्यावर सारे हसले आणि दादा म्हणाले,""शाब्बास ! ही माझी पहिली भेट.'' 

क्रांतीसिंहाच्या अखेरच्या दिवसांबद्दल त्या म्हणाल्या,""ठेच लागल्याचे निमित्त झालं. दादांचा मधुमेह चिघळला. आधी अंगठा, नंतर गुडघ्यापर्यंत पाय काढावा लागला. त्याही अवस्थेत विट्यात पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या सत्काराला ते आले. नंतर तब्येत खूपच बिघडली. मिरजेत मिशनला दाखल केले. नागनाथअण्णांची माणसं अंतूकाका, जयवंत अहिर अशी मंडळी सेवेला होती. एके दिवशी मी त्यांना आणलेल्या भाकरीचा पापूड हळूवार काढताना म्हणाले,""ताई, तुझी आई अशीच भाकरी करायची. तिच्याही भाकरीला असाच पापूड असे. त्यांचे पानावलेले डोळे भावूक चेहरा आजही डोळ्यासमोरून हलत नाही.'' 

संपादन : युवराज यादव

loading image