अण्णांनी मानले ग्रामस्थांचे आभार

मार्तंडराव बुचुडे
शनिवार, 31 मार्च 2018

राळेगण सिद्धी - ग्रामस्थांच्या रेट्यापुढे केंद्र सरकारला झुकावे लागले, या आंदोलन मुळे देशातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला तर देशातील शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबण्यास मद्दत होईल, असे जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे म्हणाले. यावेळी आण्णांनी ग्रमास्थांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले

हजारे आज दिल्ली येथून दुपारी 12 वाजता राळेगण सिद्धी येथे पोचले, प्रथम यादवबाबांचे दर्शन घेऊन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला त्या वेळी हजारे बोलत होते. 

हजारे पुढे म्हणाले, ग्रामस्थ व देशभरातील आंदोलनकर्ते यांच्या दबावापुढे सरकार नमले. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल. काही काळ जाईल मात्र भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील. पंतप्रधान कार्यालयाने तसे लेखी पत्र दिले आहे. शेतकऱ्यांचा मालाला खर्चच्या दीडपट भाव मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील व याचा लाभ संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना होणार आहे. आज सायंकाळी आठ वाजता ग्रामसभा होणार असून, त्या वेळी हजारे यांचे आभार व पेढे वाटप ग्रामस्थांतर्फे करण्यात येणार आहे.

Web Title: nagar anna hazare farmers hunger strike