'द' दारुचा नव्हे, तर 'द' दुधाचा; 31 डिसेंबर साजरा

मार्तंडराव बुचुडे
सोमवार, 1 जानेवारी 2018

सुपे (नगर): नारायणगव्हाण (ता. पारनेर) येथील शरद पवळे मित्र मंडळाचा व ग्रामस्थांचा 31 चा आदर्श उपक्रम, द दारूचा नव्हे तर दुधाचा असा ऊपक्रम राबवून गावातील येथे येणा-या प्रत्येकाला सुगंधी मसाला दुध पिण्यास देऊन 31 डिसेंबर साजरा केला. तसेच या वेळी नववर्षाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.

सुपे (नगर): नारायणगव्हाण (ता. पारनेर) येथील शरद पवळे मित्र मंडळाचा व ग्रामस्थांचा 31 चा आदर्श उपक्रम, द दारूचा नव्हे तर दुधाचा असा ऊपक्रम राबवून गावातील येथे येणा-या प्रत्येकाला सुगंधी मसाला दुध पिण्यास देऊन 31 डिसेंबर साजरा केला. तसेच या वेळी नववर्षाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.

'द' दारुचा नव्हे, तर 'द' दुधाचा असे ब्रीद वाक्य तयार करूण तरूनांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी व सरत्या वर्षाला अखेरचा निरोप देताना ज्या वाईट प्रथा चालिरिती आहेत त्यांना तिलाजंली देण्यासाठी या मंडळाने एक चांगला ऊपक्रम करूण अनेकांच्या डोळ्यात अंजण घालण्याचा प्रयत्न केला. रविवारी (ता. 31) सकाळीच त्यांनी येथे येणा-या प्रतेकाला मसाला व सुगंधी दुध पिण्यास देऊन 31 डिसेंबर साजरा करण्याचा सल्ला दिली. तसेच व्यसनापासून दूर रहाण्याचा ऊपदेश केला. याच वेळी नुतन वर्षाचे स्वागही असेच करा असा सल्लाही दिला. या ऊपक्रमाचे परीसरातून जोरदार स्वागत होत आहे.

नगर-पुणे महामार्गावरील नारायणगव्हाणमध्ये पाश्चिमात्य संस्कृतीमुळे 31 डिसेंबराख्या दिवसांचे निमित्त करुन तरुणाईला व्यसनाच्या दारात लोटण्याची परंपरा वाढीस लागल्याचे दिसत आहे याचा विचार करूण व चुकिचा पायंडा पायंडा व परंपरा मोडण्यासाठी 31 डिसेंबरला गावामध्ये दिवसभर युवा पिढीने तंदुरुस्त बनण्यासाठी रोज दुध प्यायला हवे अशी प्रेरणा देण्यासाठी श्रीराम मंगलकार्यालयासमोर स्वादीष्ट मसाला दुध बनवून गावामध्ये व्यसनमुक्ती अभियानाचा प्रारंभ केला व तालुक्यातच नव्हेतर जिल्ह्यात एक नवा आदर्श निर्माण करण्यात आला. युवा शक्ती राष्ट्राची शक्ती आहे तीला योग्य दिशा देवुन त्या शक्तीची योग्य वापर करूऩ देशाला बलवान व जागतीक स्पर्धेत प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी प्रयत्न करणे काळाची गरज आहे, तो ओळखून हा ऊपक्रम राबवुण्यात आला. त्यासाठी असे उपक्रम गावोगावी राबवावेत असे अवाहनहीमंडळातर्फे करण्यात आले.

या वेळी सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, भिमाजी कांडेकर, बाळासाहेब जगताप, भानुदास शेळके, चंद्रकांत काकडे, हुसेन शेख, मंगेश शेळके, हरिभाऊ नागरे, मुराद शेख, वैभव शेळके, नितिन चिपाडे, अनिकेत जगताप, गणेश जाधव, अजय शेळके, अक्षय जगताप, दारुबंदी चळवळीच्या शारदा वेताळ, लता कांडेकर, रुपाली शेळके उमा भालेकर आदीं मान्यवर ऊपस्थीत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagar news narayangavan 31st december and milk social work