पूरग्रस्तांच्या नावाखाली क्‍लासचालकाला गंडविले 

In the name of flood victims cheated
In the name of flood victims cheated
Updated on

नगर : पूरग्रस्तांना मदत देण्याचा बहाणा करून एका परदेशी तरुणीने, ऑनलाइन चॅटिंगद्वारे ओळख वाढवून नगरमधील एका खासगी क्‍लासचालकाला चार लाख 53 हजार रुपयांना ऑनलाइन गंडा घातला. याबाबत भाऊसाहेब विष्णू डमाळे (रा. नवलेनगर, गुलमोहर रस्ता) यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

फिर्यादीत म्हटले आहे, की भाऊसाहेब डमाळे प्रोफेसर कॉलनीत खासगी कोचिंग क्‍लासेस चालवितात. फेसबुकच्या माध्यमातून पोलंड येथील एका तरुणीशी त्यांचा संवाद झाला. "व्हॉट्‌सऍप'वर दोघांमध्ये चॅटिंग सुरू होते. सुरवातीला कौटुंबिक परिस्थितीबाबत चौकशी झाली. त्यानंतर नोकरी व व्यवसायाबाबत विचारपूस झाली. तिने अनाथ- अपंगांना मदत करीत असल्याचे सांगितले. अशा प्रकारचे कार्य आम्हाला अन्य देशांत करायचे असल्याचे तिने सांगितले. 

हेही वाचा उसाच्या ट्रॅक्‍टरने शेतकऱ्याला चिरडले 
त्याच काळात कोल्हापूर व सांगली परिसरात मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्या पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत काळे यांनी सुचविले. त्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्षाचा दूरध्वनी क्रमांकही दिला. तो बंद असल्याचे सांगून तिने डमाळे यांना बॅंक खात्याचा क्रमांक मागितला. त्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येईल, असे सांगितले. काही वेळातच डमाळे यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली. डमाळे यांना पोलंडचे चलन जमा झाल्याचा "मेल'ही आला. ही रक्कम भारतीय चलनात बदलून घेण्यासाठी आणि जीएसटीच्या नावाखाली त्यांच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली. 

पोलंड येथील चलनाची मोठी रक्कम भारतीय रुपयांत बदलून घेण्यासाठी डमाळे यांनी चार लाख 53 हजार रुपये ऑनलाइन बॅंकिंगद्वारे चार बॅंक खात्यांवर पाठविली. मात्र, काही दिवसांत हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक अरुण परदेशी तपास करीत आहेत. 

तांत्रिक तपासाद्वारे तरुणीचा शोध सुरू 
डमाळे यांची फसवणूक करणारी व्यक्ती नेमकी कोण, असा प्रश्‍न पोलिसांना पडला आहे. पोलिस तांत्रिक तपासाच्या आधारे त्या तरुणीचा शोध घेत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jayant Patil BJP Entry sangli politics
Kavthemahankal youth missing canal accident
Miraj Kolhapur Jalna ST bus attack latest news
sparrow chick falls from nest
Marathi News Esakal
www.esakal.com