esakal | नंदुर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा बाेजवारा
sakal

बोलून बातमी शोधा

water.jpg

तालुक्यातील नंदुरसह इतर दहा गावांसाठी असलेली नंदुर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या निष्काळजीपणामुळे बंधार्यात पाणी असताना बंद आहे. या योजनेचा लाभ या गावातील जनतेऐवजी  ठेकेदारालाच अधिक होत आहे.

नंदुर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा बाेजवारा

sakal_logo
By
हुकूम मुलाणी

मंगळवेढा : तालुक्यातील नंदुरसह इतर दहा गावांसाठी असलेली नंदुर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या निष्काळजीपणामुळे बंधार्यात पाणी असताना बंद आहे. या योजनेचा लाभ या गावातील जनतेऐवजी  ठेकेदारालाच अधिक होत आहे. योजना आहे गावाला आणि कोरड पडली घशाला अशी अवस्था या भागातील जनतेची झाली.

युति शासनाच्या काळात 1999 साली नंदूर सह मरवडे, डोणज, तळसंगी, भालेवाडी, बालाजी नगर, कागष्ट, येड्राव, कात्राळ, डिकसळ या अकरा गावांचा कायमचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठीच्या या योजनेवर शासनाचे अंदाजे दहा कोटी रुपये खर्ची पडले. या योजनेची चार ते पाच गावात अनेक कामे अपुर्ण आहेत. दरवर्षी निधी मिळत असतो तात्पुरते दोनशे दिवस पाणी सुरू होते पुन्हा मागेचेच पुढे असे होते 2015 साली  तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकर पाँईट म्हणून उपयोग होत होता.

सध्या या ठीकाणी एकही कर्मचारी, सुरक्षा रक्षक नसल्याने कोटयवधी रूपयाची मालमत्ता बेवारस स्थितीत आहे. योजना बंद असल्याने अकरा गावातील लोकांची पाण्यासाठी 'पाणी उशाला -कोरड घशाला अशी स्थिती झाली याबाबत गेल्या सहा महिन्यापूर्वी दैनिक सकाळने या प्रश्नावर आवाज उठवला असता आमदार भालके यांनी जिल्हा नियोजन मंडळ मधून नंदुर योजनेच्या दुरुस्तीसाठी जवळपास 24 लाखांचा निधी उपलब्ध केला. त्यात मुख्य पाईपलाईन दुरुस्तीही केबल फिल्टर, मोटारी व पाणी गळती रोखण्यासाठी कामे निविदा काढून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु या योजनेचे काम दुरुस्त चार ते पाच दिवस पाणी मिळाले त्यानंतर योजना बंद आहे सध्या तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय होत असून. नदीमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा देखील आहे अशा लोकांना पाणी पाणी करावयास लावणे यात प्रशासन धन्यता मानत आहे. भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर 39 गावाची मदार अवलंबून आहे. नंदुर प्रादेशिक योजनेमुळे या गावांना दुसरी कोणतीही योजना राबवता येत नसल्यामुळे या भागातील लोकांना पाण्यासाठी तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करण्याची वेळ आली आहे. या योजनेवर दरवर्षी शासन लाखो रुपये खर्ची टाकत आहे परंतु या योजनेचा लाभ मात्र जनतेऐवजी ठेकेदारालाच अधिक मिळत असल्यामुळे ही योजनेचा उपयोग सरकार पांढरा हत्ती पोसल्यासारखा सारखा होत आहे.

निधी तोकडा असल्यामुळे ही योजना नीट चालत नाही. या निधीतून पंप बदलता येत नाही, त्यासाठी ही योजना आंधळगाव प्रमाणे पुनर्जीवित करणे आवश्यक आहे. या योजनेचा प्रस्ताव शासनास सादर करावयाचा आहे. त्यास मंजुरी मिळाल्यास भविष्यात सुरळीतपणे चालविता येऊ शकते.
- उमाकांत माशाळे, अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण


नंदुर योजनेमध्ये समावेश असूनही  या योजनेचे पाणी  मिळत नाही त्यामुळे नवीन कोणतीही योजना राबवता येत नाही गावठाणासहीत वाडीवस्तीवरील लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.यंदाच्या दुष्काळात पाण्यासाठी सातत्याने मागणी करूनही फक्त एक दिवस पाणी मिळाले.पाण्यासाठी सध्या टँकरने सुरू आहे परंतु समाधानकारक पाऊस पाण्याचा टॅंकर बंद होणार पुन्हा काय हा प्रश्न आमच्यासमोर आहे
- रमेश पाटील, सरपंच, येड्राव

loading image
go to top