नरसिंह टायगर्सजिंकला जयंत करंडक 

धर्मवीर पाटील
Sunday, 21 February 2021

नरसिंह टायगर्स (तांबवे) हा संघ जयंत प्रीमियर कबड्डी लीगचा प्रथम विजेता संघ ठरला आहे.

इस्लामपूर (जि. सांगली) : नरसिंह टायगर्स (तांबवे) हा संघ जयंत प्रीमियर कबड्डी लीगचा प्रथम विजेता संघ ठरला आहे. हरिकेन्स (कासेगाव) यांनी दुसरा, तर स्फूर्ती रॉयल्स (जुनेखेड) व लोकनेते राजारामबापू पाटील ईगल्स (कासेगाव) या संघानी तिसरा क्रमांक पटकावला.

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत स्पोर्टस्‌ने या स्पर्धेचे आयोजन केले होते. उदय जगताप (नरसिंह) अष्टपैलू खेळाडू, विशाल चिबडे (नरसिंह) उत्कृष्ट चढाईपटू, तर आकाश शिवशरण (हरिकेन्स) उत्कृष्ट बचावपटू पुरस्काराचे मानकरी ठरले. सांगली जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांनी स्पर्धेस भेट देत खेळाडूंचे कौतुक केले. 

नरसिंह टायगर्स विरुद्ध एस. एल. हरिकेन्स यांच्यातील चुरशीच्या अंतिम सामन्यात नरसिंह प्रथम 6 गुणांनी पिछाडीवर होता; मात्र उदय जगताप व विशाल चिबडे यांच्या अष्टपैलू खेळाने ही पिछाडी भरून काढली व 5 गुणांनी विजय मिळवला. विजेत्या संघांना जि. प. माजी अध्यक्ष देवराज पाटील, माजी उपाध्यक्ष रणजित पाटील, मुख्य संयोजक नगरसेवक खंडेराव जाधव, सातारा डिस्ट्रिक्‍ट उमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा रूपाली जाधव यांच्याहस्ते पारितोषिके देण्यात आली.

यावेळी प्रकाश जाधव (दादा),अरुण कांबळे, आयुब हवालदार, अतुल लाहिगडे, ज्ञानदेव देसाई, हमीद लांडगे, ब्रह्मानंद पाटील, सागर पाटील, नितीन कोळगे, विनायक पाटील, मनीषा बाणेकर, कबड्डीपटू नितीन मदने, उपस्थित होते. 

आलम मुजावर, प्रशांत कोरे, विकास पाटील, झाकीर इनामदार, गणेश भस्मे, नीलेश देसाई, रणजित इनामदार, जयराज पाटील, सुशीलकुमार गायकवाड, सागर हेळवी, तुषार धनवडे, धनाजी सिद्ध यांनी पंच म्हणून काम पाहिले. सागर जाधव, उमेश रासनकर, सोन्या देसाई, सदानंद पाटील, सचिन कोळी, अंकुश जाधव, शिवाजी पाटील, राजवर्धन लाड, अजय थोरात यांच्यासह जयंत स्पोर्टस्‌च्या कार्यकर्त्यांनी स्पर्धेचे संयोजन केले. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narasimha Tiger won the Jayant Trophy ofJayant Premier Kabaddi League