
सांगली : भारतीय सैनिकांनी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करताना दाखवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ आज शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. कर्तव्यदक्ष सैन्यदलाबद्दल कृतज्ञ आहोत, हे दर्शवण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले.