युवक वर्गाला सक्षम करण्याचेच उद्दिष्ट

युवक वर्गाला सक्षम करण्याचेच उद्दिष्ट
Updated on

नविद मुश्रीफ म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जिल्ह्याचे नेते आणि वडील हसन मुश्रीफ यांच्यामुळे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र अंगी बाळगले आहे. बहुजन समाजातील कोणीही आल्यानंतर त्याचे काम करणे हे ध्येय आम्ही अंगी बाळगले आहे. त्यामुळे कोणीही आमच्याकडे आल्यानंतर त्याची समस्या जाणून घेऊन ती सोडवण्यासाठी आवश्‍यक पाठपुरावा केला जातो. यासाठी लागणारा पत्रव्यवहार असेल अथवा दूरध्वनीवरून संपर्क असेल किंवा संबंधितांना प्रत्यक्ष भेटूनही त्या समस्येची निर्गत करून येणाऱ्याचे समाधान केले जाते.’  

जिल्ह्यातील तरुण बेरोजगार न राहता त्याला नोकरी मिळावी यासाठी हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्न केला जातो. एखाद्या शासकीय, निमशासकीय कार्यालयातील नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत मार्गदर्शन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षा, एस. टी. पोलिस यामध्ये फाऊंडेशनच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेले अनेक तरुण कार्यरत आहेत. याचबरोबर कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना येथेही अनेक तरुणांना नोकरीच्या संधी दिल्या आहेत. सध्या राज्यसेवा परीक्षेच्या मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील तरुण शासकीय कार्यालयांमध्ये उच्चपदस्थ अधिकारी व्हावेत अशी इच्छा आहे. त्यासाठी भविष्यात केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी आवश्‍यक सुविधा उभारण्याचा मानस व्यक्त केला. 

स्पर्धा परीक्षेच्या नोट्‌स फाऊंडेशनच्या कार्यालयात उपलब्ध केल्या आहेत. या अभ्यासिकेचा लाभ दररोज २०-२५ मुले घेतात. ज्या ज्या भरती निघतील त्याचे प्रशिक्षण आपण कागलला मोफत घेतो. ते कोल्हापूर जिल्ह्यासाठी मोफत आहे.

जिल्ह्यातील कोणत्याही तरुणास आपण तेथे प्रवेश देतो. युवकांना सक्षम करणे, युवकांसाठी जे काय लागेल त्यासाठी मुश्रीफ फाऊंडेशनच्या माध्यमातून हिमालयासारखे पाठीमागे उभे राहणे हे प्रामुख्याने उद्दिष्ट आहे. ज्यांना आई-वडील नाहीत अशी अनेक मुले आम्ही दत्तक घेतली आहेत. शिक्षणासाठी ज्यांना मदतीची गरज आहे त्यांनाही फाऊंडेशनच्या मदतीचा हात पुढे केला आहे. शरीरसौष्ठव करणाऱ्या तरुणांनाही फाऊंडेशनच्या माध्यमातून हातभार लावत असल्याचे नविद मुश्रीफ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
why milk collection is falling in Sangli
dead chickens thrown from bypass bridge in Sangli
What is the Shaktipeeth Highway project?
Marathi News Esakal
www.esakal.com