बेळगाव, निपाणीत एसीबीचे छापे; कार्यालयात कागदपत्रांची झडती

एनए आणि लेआउट प्रकरणांत आपला अभिप्राय नोंदविण्यासाठी विनाकारण विलंब आणि नागरिकांकडून कामासाठी पैशाची मागणी केली जात होती.
ACB
ACB
Updated on

बेळगाव : नगर आणि ग्रामीण योजना साहायक संचालकाच्या बेळगाव आणि निपाणी येथील कार्यालयावर एसीबीने (ACB) बुधवारी (ता. २९) छापे घालून कागदपत्रांची तपासणी केली. एनए आणि लेआउट प्रकरणांत आपला अभिप्राय नोंदविण्यासाठी विनाकारण विलंब आणि नागरिकांकडून कामासाठी पैशाची मागणी केली जात होती, अशी तक्रार आल्यानंतर एसीबीने छापा (ACB Raid) घालून तपासणी केली आहे.

बेळगाव सुवर्णसौधमध्ये नगर व ग्रामीण योजना विकास कार्यालय असून, या कार्यालयाच्या अखत्यारित बेळगाव ग्रामीण, खानापूर, बैलहोंगल, रामदुर्ग व सौदत्ती तालुक्यांचा समाविष्ट आहे. निपाणीत चिक्कोडी विभागाच्या अखत्यारित अथणी, चिक्कोडी, हुक्केरी, रायबाग व गोकाक या तालुक्यांचा समावेश आहे. जमीन रूपांतरण आणि लेआउट प्रकरण निकाली काढण्यापूर्वी या कार्यालयाकडून अभिप्राय आवश्‍यक असतो; परंतु अभिप्राय देण्यासाठी विनाकारण वेळ लावला जात असल्याबाबत तक्रारी एसीबीकडे आल्या होत्या.

ACB
बेळगाव : नगरपालिकांचा आज फैसला; काही ग्रामपंचायतींचाही निकाल

तसेच यासंदर्भातील शेऱ्यासाठी पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. यामुळे छापे घालून कार्यालयातील दाखले आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे. एसीबी (उत्तर क्षेत्र) एसपी बी. एस. न्यामगौडा, डीवायएसपी करुणाकर शेट्टी, मंजुनाथ गंगाल यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Guhagar Vijapur highway latest update
Shaktipeeth Highway Protes
Sangram Jagtap statement on Kesarekar murder
Tukaram Mundhe effect on Food and Drug Administration action
Marathi News Esakal
www.esakal.com