esakal | राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे अपील जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले
sakal

बोलून बातमी शोधा

Islampur Municipal Newsletter: Leaders Creating Environment for Eclection

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे अपील जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर (सांगली) : राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात नाममात्र भाड्याने दिलेल्या मालमत्ता-जागा पुन्हा नगरपालिकेच्या ताब्यात घेण्याचा नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी वैध ठरवला आहे. नगराध्यक्षांच्या या निर्णयांना आव्हान देणारे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे अपील जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले आहे. सत्ताधारी विकास आघाडीने या निकालाचे स्वागत केले आहे. हा निकाल म्हणजे अपील पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कारभाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचाराला चपराक बसल्याचा आरोप नेते वैभव पवार यांनी केला आहे. तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांनी या निर्णयाला योग्य तेथे आव्हान दिले जाईल, असे ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.ncp-appeal-rejected-district-collector-islampur-municipality-jayant-patil-akb84

पालिकेतील सत्ताकाळात पालकमंत्री जयंत पाटील गटाच्या सत्ताधारी कारभाऱ्यांच्या विविध संस्थांना जयंत समर्थकांचे अपिल जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळलेपालिकेच्या मालमत्ता नाममात्र भाडेतत्वावर देण्याचे ठराव झाले होते.त्यामध्ये जयंत पाटील एन. ए. कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, विजयभाऊ पाटील हेल्थ क्लब, बाजार माळ इमारत व विजयभाऊ पतसंस्थेखालील टॉयलेट ब्लॉक या इमारतीचे ठराव झाले होते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीवेळी सत्तांतरानंतर संबंधित इमारती नगरपालिका प्रशासनाने ताब्यात घेण्याचा ठराव मंजूर केला होता. याकामी विकास आघाडीचे उपाध्यक्ष वैभव पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर संबंधित संस्था पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी अपिल अर्ज फेटाळत संबंधीतांना निकालाची समज देण्यात यावी, असा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.

याबाबत वैभव पवार म्हणाले, " या निकालाने नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या पारदर्शक व कायदेशीर कारभाराचा पुन्हा एकदा विजय झाला आहे, पालकमंत्री जयंत पाटील गटाच्या बेकायदेशीर कारभारावर हातोडा पडला आहे. सत्तेचा गैरवापर करत बेकायदेशीर ठराव करून नगरपालिकेच्या मालकीच्या इमारती नाममात्र भाड्याने बळकावल्या होत्या. नागरिकांच्या मनात मोठा रोष होता.

नगराध्यक्ष पाटील यांनी मालमत्ता ताब्यात घेण्याचा ठराव केला. मात्र प्रशासन दहशतीला घाबरून इमारती तत्काळ ताब्यात घेण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यासाठी मी प्रशासनाविरोधात उपोषणही केले होते. ही बाब न्यायप्रविष्ठ असल्याने उपोषण थांबवावे लागले. संबंधितांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात धाव घेतली होती. जिल्‍हाधिकाऱ्यांनी दिलेला निकाल शहरवासीयांचा स्वाभिमान जागविणारा आहे. यापुढे मागील सत्ताधाऱ्यांच्या भानगडी बाहेर काढू."राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक शहाजी पाटील म्हणाले,‘‘ निकाल नेमका काय आला आहे. ते पाहून आमची भूमिका मांडू. ३०८ अंतर्गत अपील करण्याचे कायदे बदलले आहेत, त्यामुळे या निर्णयाला आम्ही आव्हान देऊ. आम्ही चालवत असलेल्या संस्थांच्याविरोधात झालेला ठरावाच बेकायदेशीर होता, ते आम्ही जनतेसमोर आणू."

loading image