शिराळा नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे; 'यांची' बिनविरोध निवड

NCP Archana Shete Selected As Shirala City Chief
NCP Archana Shete Selected As Shirala City Chief

शिराळा ( सांगली ) - शिराळा नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या अर्चना शेटे यांची बिनविरोध निवड झाली आहे. याची अधिकृत घोषणा उद्या दुपारी होईल. आज राष्ट्रवादीच्या सुनीता निकम, प्रतिभा पवार व भाजपच्या राजश्री यादव यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे शेटे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. आता उपनगराध्यक्ष कोण याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नगराध्यक्षापदासाठी राष्ट्रवादीतर्फे नगरसेविका सुनीता निकम, प्रतिभा पवार, अर्चना शेटे तर भाजपकडून राजश्री यादव यांनी उमेदवार अर्ज दाखल केले होते. आज उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस होता. अर्चना शेटे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपनगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया उद्याच राबविण्यात येणार आहे. या दोन्ही पदाची निवडणूक प्रक्रिया १५ जून २०१७ रोजी झाली होती. त्यानुसार या पदाचा अडीच वर्षाचा कालावधी १५ डिसेंबर रोजी संपत असल्याने ही निवडणूक होत आहे. सध्या नगराध्यक्षा म्हणून सुनंदा सोनटक्के व उपनगराध्यक्ष म्हणून किर्तीकुमार पाटील काम पाहत आहेत. मात्र उपनगराध्यक्ष कोण होणार की पाटील यांनाच मुदतवाढ मिळणार याची उत्सुकता लागली आहे. ही निवडणूक प्रक्रिया या विशेष सभेचे अध्यक्ष व उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.

एक वर्षे नगरपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती

शिराळा ग्रामपंचायतीचे १६ मार्च २०१६ नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. ग्रामपंचायतीचे सदस्य बरखास्त करून त्याच दिवशी दुपारी तीन वाजता तत्कालीन तहसीलदार दीपक वजाळे यांनी प्रशासक म्हणून नगरपंचायतचा ताबा घेतला होता. त्यानंतर त्यांची बदली झाल्याने तत्कालीन तहसीलदार शीतलकुमार यादव यांनी पदभार स्वीकारला. मुख्याधिकारी म्हणून अशोक कुंभार यांची नोव्हेंबर २०१६ ला नियुक्ती झाली. त्या नंतर यादव यांची बदली झाल्याने प्रशासक म्हणून तहसीलदार दीपक शिंदे यांनी पदभार स्वीकारला. एक वर्षात तीन प्रशासक झाले. पहिल्याच नगर पंचायत निवडणुकीवर नागपंचमीच्या मुद्द्यावर शिराळकरांनी बहिष्कार टाकल्याने एक वर्षे नगरपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com