Video : राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे 'उदयनराजे' स्टाईल सेलिब्रेशन; उधळला गुलाल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 October 2019

सातारा लोकसभेसाठी सोमवारी पुन्हा पोटनिवडणूक झाली असून, याठिकाणी उदयनराजे की राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील बाजी मारणार याबाबत चर्चा आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीचा गड असलेल्या कागल मतदारसंघात मात्र निकालापूर्वीच हसन मुश्रीफ यांनी मतदानानंतर विजयोस्तव साजरा केला.

कोल्हापूर : उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले असले तरी राष्ट्रवादीतील नेते त्यांची स्टाईल विसरलेले नाहीत. कागल मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी मतदानानंतर गुलाल उधळत उदयनराजेंप्रमाणे कॉलर उडवून आनंद साजरा केला.

सातारा लोकसभेसाठी सोमवारी पुन्हा पोटनिवडणूक झाली असून, याठिकाणी उदयनराजे की राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील बाजी मारणार याबाबत चर्चा आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादीचा गड असलेल्या कागल मतदारसंघात मात्र निकालापूर्वीच हसन मुश्रीफ यांनी मतदानानंतर विजयोस्तव साजरा केला.

हसन मुश्रीफ यांनी उदयनराजेंची स्टाईल असलेल्या कॉलर उडविण्याप्रमाणे सेलिब्रेशन करत गुलाल उधळला. कोल्हापूरमधील कागल मतदारसंघात मुश्रीफ यांनी निवडणूक निकालाआधीच विजय मिरवणूक काढली. या मिरवणुकीत नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

पुण्यातही खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांनी विजयाचे बॅनर लावल्याचे पाहायला मिळाले. तर, शिवाजीनगर येथील भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनीही स्वत:च आपल्या विजयावर शिक्कामोर्तब करत फटाके फोडले. रत्नागिरीतही राष्ट्रवादीच्या उमेदवाराने विजयी मिरवणूक काढली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP candidate Hasan Mushrif celebration after voting in Kagal