esakal | Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीच्या माघारीमुळे प्रणिती शिंदेंना मोठा दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

NCP candidate withdraws the nomination against Praniti Shinde at Solapur

Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीच्या माघारीमुळे प्रणिती शिंदेंना मोठा दिलासा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलपूर : सोलापूर शहर मध्य मतदार संघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने जुबेर बागवान यांना उमेदवारी दिली होती मात्र, पवार साहेबांनी आदेश दिला म्हणून मी माघार घेत आहे अस जुबेर बागवान यांच्या वतीने सांगण्यात आले.

Video : आमदार प्रणिती शिंदे निघाल्या पायी देवीच्या दर्शनाला

यामुळे प्रणिती शिंदेंना मोठा दिलासा मिळालेला असून, राष्ट्रवादीची ताकदही प्रणिती यांच्यामागे उभी राहील. काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान यांना उमेदवारी दिली होती, त्यामुळे या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार होती.

माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या शहर मध्य विधानसभा मतदार संघातून काँग्रेसतर्फे सलग दोनवेळा आमदार झाल्या आहेत. आता त्या तिसऱ्यांदा नशीब आजमावत असून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने जुबेर बागवान यांच्या माध्यमातून आज स्वतंत्र उमेदवार दिला होता. अर्ज भरायच्या शेवटच्या टप्प्यात हा उमेदवार राष्ट्रवादीने दिला होता.

करमाळयातील शिवसेना उमेदवार रश्मी बागल यांना धक्का

सोलापूर शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी शहर उत्तर व शहर मध्य या दोन्ही मतदारसंघाची मागणी आम्ही केली होती. पक्षाने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून माजी महापौर मनोहर सपाटे यांना उमेदवारी दिली असून शहर मध्य मतदारसंघातून युवकचे अध्यक्ष जुबेर बागवान यांना संधी दिली होती.

loading image
go to top