राष्ट्रवादीसमोर गड राखण्याचे आव्हान 

ncp
ncp

आटपाडी - करगणी गट खुल्या गटातील महिलेसाठी राखीव आहे. येथून जिल्हा परिषदेच्या माजी सभापती मनीषा पाटील मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे. त्यांना राष्ट्रवादी, भाजपा आणि कॉंग्रेससमोर तगडा उमेदवार देण्याचे पहिले आव्हान आहे. त्यादृष्टीने तयारीला लागले आहेत. यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. 

जिल्हा परिषद निवडणूक निमित्ताने साऱ्यांनाच ताकद अजमावण्याची संधी आली आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सारे मैदानात उतरणार आहेत. सेनेचे आमदार अनिल बाबर गटाचे नेतृत्व करणारे तानाजी पाटील यांच्या पत्नी दिघंची गटात लढल्या होत्या. यावेळी सौ. पाटील यांनी करगणीतून लढण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे. सोमनाथ गायकवाड यांच्या "सौं' चे नावही चर्चेत आहे. 

गटात भाजपची ताकद लक्षवेधी आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी खासदार संजय पाटील आणि गोपीचंद पडळकर गटात चुरस लागली आहे. पडळकर गटाला डावलून काका गटाला उमेदवारी दिल्यास पक्षांतर्गत नाराजीचा फटका बसू शकतो. भाजपातून नीलेश गायकवाड, हरिदास गायकवाड, तानाजी यमगर, किसन कोळेकर यांच्या "सौं' ची नावे आघाडीवर आहेत. गतवेळी गटाचे प्रतिनिधित्व अमरसिंह देशमुख यांनी करून अध्यक्षपद मिळवले. सध्या राष्ट्रवादी तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. संगीता खरात, अश्‍विनी गायकवाड आणि श्रावण वाक्षे, पंतगराव गायकवाड, वसंतराव गायकवाड, किरण देशमुख यांच्या "सौं' ची नावे चर्चेत आहेत. कॉंग्रेसमधून शीतल राहुल गायकवाड, तालुकाध्यक्ष वसंतराव गायकवाड यांच्या स्नुषा यांची चर्चा आहे. 

पंचायत समितीसाठी चुरस 
शेटफळे गण ओबीसीसाठी राखीव असून भाजपातून लक्ष्मण सरगर, विनायक मासाळ, सेनेतून ज्ञानेश्‍वर जवळे, बजरंग लेंगरे, राष्ट्रवादीतून महादेव पाटील, राजू यमगर, दादासाहेब मरगळे, विठल पुकळे, रासपातून सुखदेव म्हारगुडे यांची चर्चा आहे. करगणी गण खुला असून भाजपातून जयंत पाटील, प्रमोद धायगुडे, उमेश पाटील, राष्ट्रवादीतून अण्णासाहेब पत्की, गणपत खरात, विजय पाटील, हरिभाऊ माने, दत्तात्रय पाटील, सेनेतून अभय पोकळे, रासपातून लक्ष्मण सरगरची चर्चा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com