शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करा - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

शिरोळ - तालुक्याला 2005 च्या महापुरापेक्षा, सध्याच्या महापूराची छळ अधिक बसली आहे. या महापुरात सोयाबीन, भुईमुग यासारखी पिके कुजलेली आहेत. ऊस पिकही या पुरात टिकेल याची शाश्‍वती नाही. यामुळे या शासनाने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे पिककर्ज माफ केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. 

शिरोळ - तालुक्याला 2005 च्या महापुरापेक्षा, सध्याच्या महापूराची छळ अधिक बसली आहे. या महापुरात सोयाबीन, भुईमुग यासारखी पिके कुजलेली आहेत. ऊस पिकही या पुरात टिकेल याची शाश्‍वती नाही. यामुळे या शासनाने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे पिककर्ज माफ केले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. 

पवार यांनी अर्जुनवाड, घालवाड, शिरोळ आदी पुरग्रस्त गावांना भेट दिली. शिरोळ येथील पदमाराजे विद्यालयात असलेल्या पूरग्रस्तांच्या छावणीस भेट दिली. यावेळी श्री. पवार बोलत होते.

श्री. पवार म्हणाले, असाच पुर भविष्यात येण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याने, उंचवटयाच्या ठिकाणी पुरग्रस्तांचे पुर्नवसन करावे. त्यांना तेथे घरे बांधुन द्यावी लागतील. शासनाने शिरोळ तालुक्‍यासाठी खास कायमस्वरुपी उपाययोजना करावी. पूरग्रस्तांचे संसार उभे करण्याकरीता शासन दरबारी मी स्वतः विशेष प्रयत्न करणार आहे, असही श्री. पवार म्हणाले. 

श्री. पवार म्हणाले, तालुक्यातील बहुतेकांच्या घरात पाणी गेले आहे. कांही घरे आज पडलेली आहेत, तर कांही उद्याही पडण्याची शक्‍यता आहे. यामुळे लातुरच्या भुकंपानंतर सरकारने त्याभागातील जनतेला, टिकाऊ पक्‍की घरे बांधुन दिली त्याप्रमाणे, कायमस्वरुपी निवाऱ्याची सोय करुन देणे गरजेचे आहे. शेतातील बहुतांश पिके पुराने बाधीत झाली असल्याने, ऊस पिकाकरीता घेतलेले पिक कर्ज शासनाने माफ करावे. शेतमजुराबरोबरच अन्य मजुरांनाही काम नसल्याने, या घटकांना आर्थिक मदत तात्काळ द्यावी. याकामी राज्य सरकारला मी तात्काळ विनंती करुन शिरोळ तालुकयाला कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे आवाहन करणार आहे, असेही श्री. पवार म्हणाले. 

पुरस्थितीचा आढावा घेत, उसाला एकरी एक लाख रुपये आणि भुईमुग, भात, सोयाबीन या पिकांना एकरी चाळीस हजार रुपयाची नुकसान भरपाई द्यावी. मी व आमदार उल्हास पाटील यांनी 31 जुलै पुर्वी धरणातील होणारा विसर्ग व पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेवुन, पुराचे नियोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला होता. मात्र प्रशासन गाफिल राहील्याने, तालुक्‍याबरोबरच जिल्ह्याला मोठा फटका बसला. 

- आमदार हसन मुश्रीफ

आमदार उल्हास पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यावेळी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Chief Sharad Pawar comment