काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीत अटीतटीचा सामना; 4 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीत अटीतटीचा सामना

काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीत अटीतटीचा सामना

कडेगाव : कडेगाव नगरपंचायतच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी चार जागासाठी बारा उमेदवार रिंगणात आहेत.येथे सत्ताधारी काँग्रेस,भाजप व राष्ट्रवादीमध्ये तिरंगी सामना होत असून पदयात्रा,मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटीनी निवडणूक प्रचार चांगलीच रंगत आली आहे.तसेच आरोप प्रत्यारोपांनी वातावरण चांगलेच तापू लागले आहे. पहिल्या टप्प्यात 13 जागेसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान झाले. यावेळी सत्ताधारी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीमध्ये अटीतटीचा सामना झाला आहे.

हेही वाचा: Video : रणगाडे, हेलिकॉप्टर, ड्रोन, मशिन गन्स; अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिकं

आता दुसऱ्या टप्प्यात चार जागासाठी 18 जानेवारी रोजी मतदान होत आहे.या चार जागांवर आपलेच उमेदवार विजयी व्हावेत यासाठी काँग्रेस,भाजप व राष्ट्रवादीनेही चांगलीच कंबर कसली आहे.त्यानुसार प्रचाराची रणनीती आखली जात आहे. सत्ताधारी काँग्रेसचे नेते व राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे.तर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,जि. प.चे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख,राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड,जि.प.गटनेते शरद लाड येथे सत्तांतरासाठी प्रयत्नशील आहेत.

केवळ चारच प्रभागात निवडणूक आहे.त्यामुळे इतर 13 प्रभागातील कार्यकर्ते व सर्व स्थानिक नेतेमंडळीनी येथे आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोर लावला आहे.तर प्रचाराच्या गाड्यांनी प्रत्येक प्रभागात भिरकिट सुरु केले आहे.तर कोपरा सभा, पदयात्रा, मतदाराच्या वैयक्तिक गठीभेटी, आरोप प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. तर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात येथे काँग्रेसचे नेते व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, भाजपचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे नेते व जि. प. सदस्य शरद लाड आदी नेतेमंडळीही येथे प्रचारात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगतदार ठरणार असून नगरपंचायत निवडणुकीकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: अक्कल खंडणीसाठी अन् FB लाईव्हला लागते; भाजप आमदाराचा पलटवार

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top