सांगली : राष्ट्रवादीचे नेते, माजी महापौर सुरेश आदगोंडा पाटील (Suresh Patil) यांनी काल सकाळी नेमिनाथनगगर येथील निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीने येथील उषःकाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली.