राष्ट्रवादीच्या बैठकीला दांडी; दिलीप सोपल शिवसेनेत?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 August 2019

बार्शीचे शिवसेनेचे माजी आमदार राजा राऊत भाजपमध्ये गेल्याने सोपल शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांचा विचार ऐकून पक्षांतराबाबत निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया सोपल यांनी दिली.

सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बार्शीचे आमदार आणि वरिष्ठ नेते दिलीप सोपल यांनी मुंबईतील बैठकीला दांडी मारल्याने त्यांचा शिवसेनेतील प्रवेश निश्चित मानण्यात येत आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप सोपल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत बोलाविलेल्या बैठकीला दांडी मारली. त्यांनी भविष्यातील रणनितीविषयी बार्शीत कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांचा शिवसेना प्रवेश ठरला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

बार्शीचे शिवसेनेचे माजी आमदार राजा राऊत भाजपमध्ये गेल्याने सोपल शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांचा विचार ऐकून पक्षांतराबाबत निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया सोपल यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Dilip Sopal may be entered Shivsena