esakal | गडहिंग्लजमधील राष्ट्रवादीचे 'हे' नेते भाजपमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लजमधील राष्ट्रवादीचे 'हे' नेते भाजपमध्ये

गडहिंग्लज - राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विठ्ठल भम्मानगोळ, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या महिला अध्यक्षा डॉ. बेनिता डायस यांच्यासह माजी उपनराध्यक्ष रमेश रिंगणे, माजी नगरसेवक चंद्रकांत सावंत यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. ‘म्हाडा’चे (पुणे) अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या उपस्थितीत कागल येथील कार्यक्रमात या सर्वांनी ‘कमळ’ हातात घेतले. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

गडहिंग्लजमधील राष्ट्रवादीचे 'हे' नेते भाजपमध्ये

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज - राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विठ्ठल भम्मानगोळ, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या महिला अध्यक्षा डॉ. बेनिता डायस यांच्यासह माजी उपनराध्यक्ष रमेश रिंगणे, माजी नगरसेवक चंद्रकांत सावंत यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. ‘म्हाडा’चे (पुणे) अध्यक्ष समरजित घाटगे यांच्या उपस्थितीत कागल येथील कार्यक्रमात या सर्वांनी ‘कमळ’ हातात घेतले. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनीच सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे.

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपदी कार्यरत असलेले भम्मानगोळ यांनी अचानक आज भाजपत प्रवेश केल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. शहरातील राष्ट्रवादी पक्षातील निर्णय प्रक्रियेत पदाधिकाऱ्यांना स्वातंत्र्य नसल्याच्या कारणाने भाजपत प्रवेश केल्याचे भम्मानगोळ यांनी ‘सकाळ’ला सांगितले. त्यांच्याबरोबर महिला अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्षा डॉ. डायस यांनीही कमळ हातात घेतले आहे. 

दरम्यान, श्री. रिंगणे जनसुराज्यमध्ये असताना गडहिंग्लजचे उपनगराध्यक्षपद भूषविले होते. २०१६ च्या पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. परंतु, थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीत त्यांना भाजपने डावलले. त्याच निवडणुकीत त्यांनी अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीत प्रवेश करून घड्याळ चिन्हावर थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविली. तेव्हापासून ते याच पक्षात सक्रिय होते. आता त्यांनीही भाजपत प्रवेश केला आहे. 

याशिवाय माजी नगरसेवक चंद्रकांत सावंत, करंबळीचे माजी सरपंच व सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप मोटे, बेकनाळचे माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन मोटे आदींनीही भाजपत प्रवेश केला. या सर्वांचे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी पक्षात स्वागत केले.

loading image
go to top