Sangli : 'रोग आल्यावर औषध, आण मेल्यावर मदत' धोरण बंद करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

Sangli : 'रोग आल्यावर औषध, आण मेल्यावर मदत' धोरण बंद करा

कुंडल : रोग आल्यावर औषध आणि मेल्यावर मदत हे धोरण बंद करा. रोगांचा प्रसार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक लसींचा पुरेसा पुरवठा केला तर पशुधन दगावणार नाही, असे परखड मत आमदार अरुण लाड यांनी व्यक्त केले. लम्पी रोगाचा प्रसार व पशुधनाचे नुकसान याविषयी ते बोलत होते.

आमदार लाड म्हणाले,‘‘शेतीला पशुधनाचा आधार आहे. दुग्ध व्यवसायाने ग्रामीण भागात अमृतवाहिनी आणल्याने आर्थिकदृष्ट्या सक्षम होणाऱ्या ग्रामीण भागाला कोरोना व नंतर महापुराच्या संकटात दुग्धव्यवसायानेच तारले. शेती अशाश्वत होत असताना दुग्ध व्यवसायाने शेतकऱ्याला तारले. देशाची दुधाची तहान भागवणाऱ्या पशुधनाच्या रक्षणासाठी संशोधन होऊन भविष्यात येणाऱ्या रोगाबाबत प्रतिबंधात्मक लस देणे गरजेचे असताना सरकारी पातळीवर अनास्था आहे.

ते म्हणाले,‘‘देशातील पशुवैद्यकीय सेवा मृत झाली आहे. पशुधन वाढूनही वैद्यकीय सुविधेचा दर्जा ढासळला आहे. आहे त्या पशुवैद्यकीय दवाखान्यात प्रशिक्षित बीव्हीएससी पदवीधर कर्मचारी नसल्याने पशुधन दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. अनेक वर्षे शासनाने पशुवैद्यकीय अधिकारी, तत्सम पदे भरली नसल्याने संसर्गजन्य रोगाला आळा घालणे शक्य होत नाही.’’ लम्पी रोगाची लागण होताना शासनाने कागदोपत्री कार्यवाही केली. पण प्रत्यक्षात ती कर्मचाऱ्यांअभावी अमलात कशी आणणार? लम्पीमुळे देशातील दूध व्यवसाय धोक्यात येईल. दूध तुटवड्याला सामोरे जावे लागेल. शासनाने ठोस निर्णय घेऊन कृतिशील कार्यक्रमाची आखणी करून अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे श्री. लाड यांनी सांगितले.

Web Title: Ncp Mla Arun Lad Medicine Disease Criticism Of Goverment Sangli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..