esakal | अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्नसाठी सुप्रिया सुळे लोकसभेत आवाज उठवणार
sakal

बोलून बातमी शोधा

ncp mp supriya sule statement Anna Bhau Sathe  nominated for the Bharat Ratna sangli news latest news

समाजाला न्याय देणाऱ्या लोकांची पक्षाला गरज आहे.

अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्नसाठी सुप्रिया सुळे लोकसभेत आवाज उठवणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नेर्ले (सांगली) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न 'किताब मिळालाच पाहिजे यासाठी  मी येणाऱ्या लोकसभा अधिवेशनात शंभर टक्के प्रयत्न करेन असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.त्या वाटेगाव (ता. वाळवा) येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मभूमीत मानवहित लोकशाही पक्षाच्या राज्यस्तरीय बैठक कार्यक्रमात सुळे यांनी सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या. 

 मानवहित  लोकशाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिनभाऊ साठे म्हणाले," समाजहिताचे राजकारण राज्यात उभे रहावे यासाठी मानवहित लोकशाही पक्ष काम करणार आहे. समाजाला न्याय देणाऱ्या लोकांची पक्षाला गरज आहे. त्यासाठी लोकचळवळ उभा करावयाची आहे. यावेळी मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने उभे केलेल्या व निवडणूकीत निवडून आलेल्या नुतन ३० ग्रामपंचायत सदस्याचा सत्कार करण्यात आला. 

हेही वाचा- धक्कादायक! सांगलीत कुटुंबात तिघांनीही संपवली जीवनयात्रा -

यावेळी आण्णाभाऊच्यां स्नुषा सावित्री साठे, युवा नेते प्रतिक पाटील, जि. प.चे माजी बांधकाम व आरोग्य सभापती रवींद्र बर्डे, जि.प.चे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सभापती शुभांगी पाटील, सरपंच सुरेश साठे, उपसरपंच शुभांगी पाटील,गणेश भगत, राधाकृष्ण साठे, फकिरा साठे, प्रकाश पाटील, संपतराव पाटील, सुरज साठे ,शेकर साठे विनोद जाधव, शामराव खोत ग्राम विकास अधिकारी सुरेश सातवेकर यावेळी महाराष्ट्रातील २५ हुन जिल्ह्यातील मानवहीत लोकशाही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे