पॅकेजमधील फुलाची पाकळी तरी मिळेल आता याचीच प्रतीक्षा;पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जयंत पाटीलांनी साधला निशाणा

NCP State President Jayant Patil criticism on pm narendra modi and devendra fadnvis sangli political marathi news
NCP State President Jayant Patil criticism on pm narendra modi and devendra fadnvis sangli political marathi news

सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर केले होते.  या पॅकेजमधील केंद्र सरकारकडून फुल ना फुलाची पाकळी तरी मिळावी .आम्हाला नरेंद्र मोदींकडून फार अपेक्षा आहे पण अजूनही आम्हाला मदत मिळाली नाही. या मदतीच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.सांगलीतील विटा नगरपालिकेला जयंत पाटील यांनी भेट दिली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते.

पुढे ते म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा जगाचा अभ्यास चांगला झालेला दिसतोय. परदेशातील लाॅकडॉन  आणि राबवलेली धोरणे याचा त्यांनी खूप कौतुक केले. पण भारताचा त्यांनी उल्लेख केलेला नाही. यात मला थोडी शंका वाटते. अशी टीकाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

केंद्र सरकारकडून जीएसटीची रक्कम मिळण्यास उशीर होत आहे. यामुळे  बरीच रक्कम प्रलंबित आहे.  त्यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. असेही जयंत पाटील म्हणाले.


केंद्र सरकारकडून जीएसटीची रक्कम मिळण्यास उशीर होत आहे. यामुळे  बरीच रक्कम प्रलंबित आहे.  त्यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. असेही जयंत पाटील म्हणाले.खासदारांना त्यांच्या मनाप्रमाणे जर पदाधिकारी हवे असतील तर ते जिल्हा परिषदेमध्ये बदल करू शकतात अशा शब्दात पालकमंत्री ना. जयंत पाटील यांनी गौप्यस्फोट केला.सांगली महानगरपालिकेमध्ये करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर आता पालकमंत्री .जयंत पाटील यांची करडी नजर आता जिल्हा परिषदेकडे  असल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहेत. मात्र मंत्री पाटील याबाबत नेहमीप्रमाणे उघडपणे काहीही बोलण्यास तयार नाहीत. या पार्श्वभूमीवर विटा मध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. 

असा केला गौप्यस्फोट

मी मागे सांगितले ना,महापालिका निवडणुकीच्या वेळी मला कोरोना झाला होता, त्यामुळे त्या सत्तांतरात माझा काहीही रोल नाही. आता जिल्हा परिषदेच्या वेळी परत कोरोना होऊ नये म्हणजे मिळवली. त्यावर कोरोना झाल्या कि सत्तांतर होते असे म्हणता येईल का ? अशी गुगली टाकताच त्यांनी कोरोना एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे जिल्हा परिषद मध्ये आपले काय ? त्यावेळी कोरोना झाल्यामुळे काहीच करू शकलो नाही  त्यावर आता तरी तुम्हाला कोरोना नाही ना! तुम्ही बरेच काही करू शकता, असे म्हणताच मंत्री पाटील यांनी आपण त्यांना मदत करु असे आवर्जून सांगितले. त्यावर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाबाबत खासदार आग्रही आहेत सातत्याने बैठका घेत आहेत. याबाबत आपले मत काय त्यावर मंत्री पाटील यांनी  आपल्या नेहमीच्या स्टाईलने खासदार ना? खासदारांच्या मनाप्रमाणे सभापती, अध्यक्ष निवडणार असतील. तर ते तसं बदलून करू शकतील असा गौप्यस्फोट केला.

संपादन- अर्चना बनगे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com