esakal | जयंत पाटीलांनी दिले दहा लसींचे पैसे! प्रकरण आहे तरी काय?

बोलून बातमी शोधा

 जयंत पाटीलांनी दिले दहा लसींचे पैसे! प्रकरण आहे तरी काय?
जयंत पाटीलांनी दिले दहा लसींचे पैसे! प्रकरण आहे तरी काय?
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज कोरोनाचा पहिला डोस घेतला. त्यांनी एक डोस घेतला मात्र, दहा लसींचे पैसे दिले. त्यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांनी ही आगळीवेगळी मोहिम हाती घेतली आहे. स्वतःसह दहा जणांच्या लसीचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन या संकटात खारिचा वाटा उचलण्याचे आवाहन केले आहे. जयंत पाटील यांनी लस घेतल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांच्याकडे धनादेश सुपुर्द केला. याबाबतची माहिती सोशल मीडियातून त्यांनी शेअर केली.

जयंतरावांनी म्हटले आहे की, आज सांगली येथे लसीचा पहिला डोस घेतला. प्रतीक जयंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या #Citizens4Maharashtra या मोहिमेचे समर्थन म्हणून माझ्यासह दहा जणांच्या लसीचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत म्हणून दिला. या तरुणांनी सुरू केलेला उपक्रम फार स्तुत्य आहे.

लस अगदी सुरक्षित आहे. त्यामुळे प्रत्येकाने शासनाच्या नियमानुसार लस घ्यावी. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत आहे आणि परिस्थिती आटोक्यात येत आहे. मला विश्वास आहे की कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरेल.

Edited By- Archana Banage