esakal | राष्ट्रवादीने पंतप्रधानांना थेट पाठवल्या पोस्टांने गोवऱ्या
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादीने पंतप्रधानांना थेट पाठवल्या पोस्टांने गोवऱ्या

राष्ट्रवादीने पंतप्रधानांना थेट पाठवल्या पोस्टांने गोवऱ्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस सांगली (Sangli) महिला आघाडीतर्फे केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर सहा महिन्यात दाम दीडपट केले. या दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर चूल पेटवून महिलांनी निदर्शने केली. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी विधानसभा क्षेत्र महिला अध्यक्ष डॉ. छाया जाधव यांच्या नेतृत्वाखाली झाले. आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रजिस्टर पोस्टाने गोवऱ्या पाठविल्याची माहिती डॉ. जाधव यांनी यावेळी दिली.

डॉ. जाधव म्हणाल्या की, या दरवाढीच्या विरोधात आम्ही सतत आंदोलने करत आलेलो आहे. पण, केंद्र सरकारने कोणतीही दखल घेतलेली नाही. या दरवाढीमुळं सर्वसामान्य महिलांचं बजेट कोलमडलेले आहे. त्यांना आता गॅस ऐवजी शेणाच्या गोवऱ्यावर स्वयंपाक करावा लागत असल्याने या गोवऱ्या देशाचे पंतप्रधान मोदी यांना पाठवल्या आहेत.

हेही वाचा: राज्य सरकारच्या धोरणावर सांगलीकर नाराज; जिल्ह्यासाठी हवेत 800 कोटी

अनिता पांगम, आयेशा शेख, अमृता सरगर, वंदना सूर्यवंशी, रंजना व्हावळ, वैशाली सूर्यवंशी, शकुंतला हिंगमीरे, सोनाली सूर्यवंशी, रुक्मिणी सूर्यवंशी, सोनाली कुकडे, उषा पाटील, मीना आरते, सुनीता कुकडे, सविता सरगर, पूजा थोरात, सारिका सरगर, रेखा सूर्यवंशी, शोभा शिंदे, नेहा सूर्यवंशी, माधुरी सूर्यवंशी, योगीता सूर्यवंशी आदी उपस्थित होत्या.

loading image
go to top