
इस्लामपूर : शकुंतलानगर वाघवाडी (ता. वाळवा, जिल्हा सांगली )येथील एन डी पाटील शुगर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादकांना 3300 प्रतिमेट्रीक टन एवढा उच्चांकी दर देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील व केदार पाटील यांनी दिली.२५०० मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमता असलेला हा कारखाना पहिला ट्रायल गळीत हंगाम शुभारंभ येत्या दहा दिवसात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.