सांगली : नीट परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोघांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ताब्यात घेतल्याचे समजते. त्यातील एक संशयित हा सांगलीचा असून पथकाने छापेमारी करत त्याला ताब्यात घेतल्याचे समजते आहे. मात्र, याबाबत अधिकृत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही. घोटाळाप्रकरणी आता सांगली कनेक्शनची चर्चा सुरू झाली आहे.