esakal | कुंचीमुळे श्वास गुदमरून सहा दिवसाच्या अर्भकाचा मृत्यू | New Born Baby
sakal

बोलून बातमी शोधा

Born Baby Death

कुंचीमुळे श्वास गुदमरून सहा दिवसाच्या अर्भकाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - अवघ्या सहा दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाचा कुंचीमुळे श्वास गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवार (ता. १०) नेहरूनगर येथील एका खाजगी रुग्णालयात ही घटना घडली असून या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी, सुळगा हिंडलगा येथील ज्योती सागर जाधव (वय २१) या महिलेला बाळंतपणासाठी नेहरूनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवार (ता.४) तिच्यावर शिजरिंग करण्यात आले. त्यावेळी त्यांनी स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म दिला. सहा दिवसाच्या अर्भकाला कुंची घालून ती गळ्याला घट्ट आवळण्यात आली. त्यामुळे श्वास गुदमरून अर्भकाचा काल मृत्यू झाला. त्यामुळे मातेसह मृत अर्भकाला घरी नेण्यात आले. आज ही घटना समजताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अवघ्या सहा दिवसाच्या अर्भकाला कुंचीमुळे जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top