पैरा फिटला..आता मैत्रीपर्व : कदम-लाड यांच्यातील मैत्रिचा नवा अध्याय

lad and kadam.jpg
lad and kadam.jpg
Updated on

कडेगाव (सांगली)- दिर्घकाळचे राजकीय वैर विसरून विधानसभा निवडणुकीवेळी कदम आणि लाड गटात समझोता झाला. त्यानुसार लाड यांनी विश्वजित कदम यांना विधानसभेवेळी मदत केली. त्याची परतफेड आता कदम यांनी पुणे पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवेळी करीत पैरा फेडला. 

1995 च्या विधानसभा निवडणुकीपासून पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात लाड - देशमुख असा राजकीय पैरा होता. त्यामुळे कुंडलचे लाड व कडेपूरच्या देशमुख कुटुंबांचा घरोबा दिवसेंदिवस वाढतच गेला. तेव्हापासून लाड यांनी प्रत्येक निवडणुकीत देशमुख कुटुंबाची साथ दिली. तर 2014 ला पृथ्वीराज देशमुख यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. तर लाड यांनी जातीयवादी भाजपमध्ये जाणार नाही असा पवित्रा घेत राष्ट्रवादीतच राहणे पसंत केले. तर देशमुख हे भाजपमध्ये डेरेदाखल झाले. 

2014 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाड यांनी भाजपचे उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांचा जाहीरपणे प्रचार करत लाड-देशमुख कुटुंबाचा राजकीय घरोबा जपला होता. परंतु या निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. त्यानंतर काही कारणाने लाड - देशमुख यांच्यातील मैत्रीपर्वाची घडी विस्कटत गेली. राजकीय घरोबाही संपला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विश्वजित कदम यांनी अरुण लाड यांना साद घातल्यानंतर लाड यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मदतीचा हात दिला. त्यावेळी कदम यांना विक्रमी मताधिक्‍य मिळाले. पदवीधरसाठी शरद पवार यांनी लाड यांना कुंडलच्या कार्यक्रमात उमेदवारीचा शब्द दिला होता. मात्र त्यासाठी कदम यांच्या मदतीची गरज होती. भारती विद्यापीठ परिवाराने पाच जिल्ह्यातील आपली यंत्रणा सक्रिय करीत लाड यांना मदत दिली. त्यामुळे आता कदम-लाड यांच्यातील मैत्रिपर्वाचा नवा अध्याय लिहण्यात आला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com