खुशखबर : दहावी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांसाठीचे वेळापत्रक लवकरच.... 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 6 एप्रिल 2020

27 मार्चपासून दहावीच्या वार्षिक परीक्षेला सुरुवात होणार होती मात्र कोरोनामुळे दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता परीक्षा कधी होणार याची चिंता सर्वच विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे.

बेळगाव  : लॉकडाउनची मुदत संपताच दहावी परीक्षेचे नवे  वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे तसेच परीक्षेला सुरवात होण्यापूर्वी एक आठवडा विद्यार्थ्यांना शाळेत विशेष उजळणी वर्ग घेण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. 

27 मार्चपासून दहावीच्या वार्षिक परीक्षेला सुरुवात होणार होती मात्र कोरोनामुळे दहावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे आता परीक्षा कधी होणार याची चिंता सर्वच विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे. मात्र शिक्षण खात्याने 14 एप्रिलनंतर नवे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल अशी माहिती दिली आहे तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले आहे.

हेही वाचा- कोरोनाचा व्यापारी वर्चस्ववाद....

7 दिवसात उजळणीवर भर ​
परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी 7 दिवस शाळा सुरू ठेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून 7 दिवसात उजळणीवर भर दिला जाणार आहे. विद्यार्थी शाळेत आल्याने ते परीक्षा चांगल्या प्रकारे देऊ शकतील तसेच निकाल वाढीसाठीही याचा लाभ होईल असे मत अधिकारी व शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. 4 मार्चपासून सुरू झालेल्या बारावी परीक्षेचा फक्त इंग्रजी विषयाचा पेपर शिल्लक असून हा पेपर दहावी परीक्षा काळात घेण्याचा विचार पदवीपूर्व शिक्षण खात्याने सुरू केला असून एक पेपर शिल्लक असल्याने बारावीचे विद्यार्थीही परीक्षेच्या प्रतीक्षेत आहेत. 

हेही वाचा- चिंता करू नका टाळेबंदीच्या कालावधीतही कामगारांना पगार मिळणार पूर्ण...

परीक्षेच्या अगोदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यामुळे निकाल वाढीसाठी मदत होईल तसेच त्यांच्यातील परीक्षेबाबत असलेली भीतीही कमी होईल नवे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर उजळनी वर्गांचे नियोजन केले जाणार आहे. 
ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new schedule for class x exams released belgaum marathi news