esakal | नव्या वर्षात अकरा साखर कारखान्यांची रणधुमाळी 

बोलून बातमी शोधा

New Year Election In 11 Sugar Factories In Kolhapur Sangli Marathi News

कसबा बावडा येथील राजाराम कारखान्याच्या विद्यमान संचालकांची मुदत 21 एप्रिल 2020 रोजी संपत आहे. या कारखान्याच्या मतदार यादीचा कार्यक्रम सुरू झाला आहे.

नव्या वर्षात अकरा साखर कारखान्यांची रणधुमाळी 
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - नव्या वर्षात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील 11 साखर कारखान्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी होणार असून, यात कोल्हापूर जिल्ह्यातील पाच, तर सांगली जिल्ह्यातील सहा कारखान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील "राजाराम कारखाना कसबा बावडा' आणि "कुंभी-कासारी कुडित्रे' या दोन कारखान्यांची निवडणूक चांगलीच गाजण्याची शक्‍यता आहे. त्याचे पडसाद कारखाना कार्यक्षेत्रात उमटू लागले आहेत. 

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात सहकारी व खासगी मिळून 38 कारखाने आहेत. यापैकी काही सहकारी साखर कारखाने बंद आहेत. त्यातील काही कारखाने खासगी तत्त्वावर भाड्याने दिले आहेत. ज्या कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत 2020 या वर्षात संपते, अशा कारखान्यांची माहिती राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने मागवली आहे. त्यानुसार या दोन जिल्ह्यांतील ही माहिती तयार केली आहे. त्यात विभागातील 11 सहकारी कारखान्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी नव्या वर्षात पाहायला मिळणार आहे. 

हेही वाचा - अरे ! ही लग्न पत्रिका ? नव्हे ही तर राष्ट्रवादीची.... 

बावडा कारखाना निवडणूक गाजण्याची शक्यता

कसबा बावडा येथील राजाराम कारखान्याच्या विद्यमान संचालकांची मुदत 21 एप्रिल 2020 रोजी संपत आहे. या कारखान्याच्या मतदार यादीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. त्यातून विरोधक व सत्ताधाऱ्यांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या कारखान्यावर माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे. त्याला शह देण्यासाठी आमदार सतेज पाटील मैदानात उतरले आहेत. या दोन पारंपरिक विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे या कारखान्याची निवडणूक गाजण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा - महाडिक बंधुंनी भाजपचा पर्याय का निवडला ? 

निवडणुका होणारे कारखाने 

*कारखान्याचे नाव........ विद्यमान संचालकांची मुदत 

कोल्हापूर 

 • छत्रपती राजाराम -कसबा बावडा 21 एप्रिल 2020 
 • डॉ. डी. वाय. पाटील-गगनबावडा 18 मार्च 2020 
 • शरद कारखाना-नरंदे, ता. हातकणंगले 17 मार्च 2020 
 • तात्यासाहेब कोरे-वारणानगर, ता. पन्हाळा 8 मे 2020 
 • कुंभी-कासारी, कुडित्रे 29 डिसेंबर 2020 

सांगली 

 • निनाईदेवी, कोकरूड, ता. शिराळा 14 एप्रिल 2020 
 • राजारामबापू पाटील, साखराळे, ता. वाळवा 30 मे 2020 
 • माणगंगा साखर कारखाना, आटपाडी 29 मे 2020 
 • डॉ. पतंगराव कदम सोनहिरा, वांगी 15 मे 2020 
 • मोहनराव शिंदे, आरग, ता. मिरज 22 मे 2020 
 • विश्‍वासराव नाईक, चिखली, ता. शिराळा 22 मे 2020