निर्दयी मातेचे नवजात अर्भकासोबत निर्दयी कृत्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

कोडोली माले रोड दरम्यान माले येथील सरकारी माळरानाच्या निलगिरीच्या झाडीत रविवारी पहाटे नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक आढळले आहे. हे अर्भक टाकून देण्यात आल्यानं नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे. अर्भकाला टाकून देणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. 

कोडोली (कोल्हापूर) : कोडोली माले रोड दरम्यान माले येथील सरकारी माळरानाच्या निलगिरीच्या झाडीत रविवारी पहाटे नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक आढळले आहे. हे अर्भक टाकून देण्यात आल्यानं नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिसात झाली आहे. अर्भकाला टाकून देणाऱ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. 

हे पण वाचा -  महापूर झेलूनही राज्यात कोल्हापूरच भारी

कोडोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोडोली माले रोड दरम्यान माले येथील सरकारी माळरानात निलगिरीचे वन आहे. त्या वणाकडे पहाटे सहाच्या सुमारास ऊसतोड मजूर शौचास गेला असता त्याला तेथे बालकाचा रडण्याचा आवाज आला. त्याने तेथे जाऊन पाहिले असता तेथे नुकतेच जन्मलेले अर्भक दिसून आले. त्याने ही माहिती कोडोली पोलिसात दिली असता कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार दीपक पोळ घटनास्थळी आले. अर्भकास मुंग्या लागल्याचे निदर्शनास आले. जवळच रहात असलेल्या ऊस मजूर वस्तीवरून गरम पाणी आणून त्या अर्भकास त्यांनी अंघोळ घालून त्याला कोडोली उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्‍टरांनी त्याच्यावर उपचार केले नंतर तो सुस्थितीत असल्याचे सांगितले व त्याचा जन्म रविवार पहाटे तीनच्या सुमारास झाला असून ते नऊ महिने परिपक्व झालेले अर्भक आहे. या अर्भकाचे वजन 3 किलो असून त्याला पुढील उपचारा करीत कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात शिशु बाल विभागात हलवण्यात आले आहे. 

हे पण वाचा - चोरी केली कोल्हापुरात आणि अटक..

संबंधितावर कारवाईची मागणी 
पन्हाळा तालुक्‍यात सर्वाधिक कमी स्त्रीचा जन्मदर आहे. स्त्री जन्मदर वाढावा, यासाठी सातत्याने शासन स्तरावर प्रबोधनासह उपाय योजना सुरू आहेत. याला मूठमाती देत स्त्री जातीचे अर्भक टाकून देणारी माता किती कठोर हृदयाची असेल अशी चर्चा गावात होती. या महिलेचा शोध घेऊन तिला कडक शासन करण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Newborn Infants Fund in Kolhapur