कोल्हापूरातल्या 'या' भागांवर राहणार तिसऱ्या डोळ्याची करडी नजर...

nighty eight new cctv camera will be installed in kolhapur marathi news
nighty eight new cctv camera will be installed in kolhapur marathi news

कोल्हापूर - राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरेवाडी, पाचगावसह कळंबा भागाला आता सुरक्षा कवच मिळणार आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या तीन महिन्याच्या अथक प्रयत्नाला यश आले. या तिन्ही भागात दोन नव्हे तर ९८ सीसी टीव्ही बसविण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे काम तीन महिन्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. 

पोलिसांना होणार मदत

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचा विचार करता करवीर पोलिस ठाण्याची हद्द सर्वात मोठी आहे. मोरेवाडी, पाचगाव आणि कळंबा हे भागही याच पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतात. गेल्या काही वर्षात येथील लोकवस्ती झपाट्याने वाढत आहे. त्याच प्रमाणात या भागात चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नॅंचिंगसह हाणामाऱ्यांचे वारंवार प्रसंग घडतात. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांना प्रत्येक ठिकाणी गस्त घालण्यात मर्यादा येतात. तसाच हा भाग राजकीय दृष्ट्या नेहमीच संवेदनशिल गावाच्या यादीत राहीलेला आहे. लोकसभा, विधानसभा असो व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा काळ येथे पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागतो. वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी करायचे असेल तर भागात सीसी टीव्हीचा वॉच असणे गरजेचे आहे. 

पोलिस अधीक्षकांच्या परिश्रमाला यश

पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मोरेवाडी, पाचगाव, कळंबा या भागात सीसी टीव्ही बसविण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. त्यापूर्वी त्यांनी करवीचे पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मदतीने तिन्ही भागातील मुख्य चौक, कॉलन्या, बस, रिक्षा थांबे, प्रवेशाचे व बाहेर पडण्याचे मार्ग आदींचा तीन महिने सर्व्हे केला. त्यानंतर सीसीटीव्ही बसविण्याच्या जागा आणि पाचगाव येथील कंट्रोल रूम निश्‍चित केली. या प्रस्तावास नुकतीच मंजुरी मिळाली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामाबाबतची निविदाही काढली आहे. लवकरच कामाची सुरवात होणार असून येत्या तीन महिन्यात या कामाची पूर्तता होईल अशी अपेक्षा आहे. सीसी टीव्हीच्या या जाळ्यामुळे भागातील नागरिकांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. तसेच पोलिसांनाही गुन्ह्यांवर अंकूश ठेवण्याबरोबर त्याची उकल करण्याच्या कामात मदत मिळणार आहे. 

दृष्टीक्षेपात 

  • करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावे - १२८
  • मनुष्यबळ मंजूर - ८५
  • उपलब्ध कॅमेरे - ७०

कळंबा, मोरेवाडी, पाचगाव भागात सीसी टीव्हीचे जाळे बसविण्याच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. 

- डॉ. अभिनव देशमुख, 
पोलिस अधीक्षक
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com